आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र
कोऱ्हाळे बुद्रुकच्या भारती सतीश खोमणे(गावडे) कृषी विभागाच्या उपसंचालक,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषीसेवा २०२१ परीक्षेमध्ये 'कृषि उपसंचालक' म्हणून भारती सतीश खोमणे (गावडे) यांची नुकतीच निवड करण्यात आली.

0
1
4
5
7
6
कोऱ्हाळे बुद्रुक: नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा २०२१ चे विविध विभागातील निकाल जाहीर करण्यात आले होते. यामध्ये कृषीसेवा २०२१ या परिक्षेचाही निकाल जाहीर झाला,त्यात कोऱ्हाळे बुद्रुक ता. बारामती येथील भारती सतीश खोमणे (गावडे) यांची कृषी विभागाच्या “कृषि उपसंचालक” म्हणून निवड झाली.
या परीक्षेत त्यांनी मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
त्यांना नुकतीच सातारा येथे उपसंचालक (कृषि व्यवसाय) या पदावर नियुक्ती मिळालेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण भैरवनाथ विद्यालय पारवडी ता.दौंड येथे झाले.तर पुढील शिक्षण त्यांनी शासकीय कृषि महाविद्यालय,पुणे येथून बीएससी ॲग्री पूर्ण केले आणि एमएससी ॲग्री महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पुर्ण केले.
त्या लग्ना अगोदर मंडल कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, त्यांचे स्वप्न श्रेणी १ ची अधिकारी व्हायचे होते व त्यांनी ते लग्नानंतर अभ्यासासाठी अथक परिश्रम करून कृषी उपसंचालक ही पदवी मिळवली व आपले स्वप्न पुर्ण केले.
त्यांच्या या यशात माहेर इतकेच सासरच्याही कुटुंबाचा परिवाराचा सहभाग व सहकार्य लाभले आहे असे त्यांनी बोलताना सांगितले.