मुंबई : राज्यात माहियुती सरकार अस्तित्वात आले, परंतु महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराचे गूढ अजून कायम आहे. दिल्लीत गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी पक्ष नेतृत्वाकडे सादर केली आहे व त्यावर लवकरच केंद्रीय नेतृत्व शिक्कामोर्तब करेल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, त्याचबरोबर १४ तारीख ही शपथविधीची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी १४ तारखेलाच होईल अशी चर्चा आहे.
व त्यानंतरच फडणवीस सरकारचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर पासून सुरू होईल.तत्पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे.
महायुती सरकारच्या विस्तारित मंत्र्यांमध्ये भाजपकडे २१, शिवसेनेकडे १३ आणि अजित पवार यांच्याकडे ९ मंत्रीपदे असतील असा फॉर्मुला निश्चित झाला आहे असे बोलले जात आहे,
सध्या मंत्रिमंडळात असलेल्या तिन्ही पक्षांच्या काही ज्येष्ठ नेत्यांना यावेळी संधी न देता नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे शिवसेनेकडून पाच नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते त्या त संजय शिरसाठ आणि प्रताप सरनाईक यांना संधी मिळू शकते.
कोण मंत्रीपदाची उमेदवार असू शकतात? व
कोणाला मंत्री बनवले जाऊ शकते?
अशा संभाव्य मंत्र्यांची नावे

मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते व अर्थ खाते राहील, तर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास व महसूल अशी खाते असतील त्याचबरोबर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम अशी खाती असण्याची शक्यता आहे.

भाजपाच्या संभाव्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संभाजी निलंगेकर,जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, विजयकुमार गावित, देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर,राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, तसेच प्रवीण दरेकर,मंगल प्रभात लोढा,बबनराव लोणीकर,पंकजा मुंडे,आशिष शेलार, योगेश सागर,गोपीचंद पडळकर, यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
तर शिवसेनेचे संभाव्य मंत्री म्हणून दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर,अर्जुन खोतकर,भरत गोगावले,संजय शिरसाठ,राजेश क्षीरसागर, आशिष जैस्वाल, प्रताप सरनाईक,प्रकाश सुर्वे, योगेश कदम,बालाजी किनिकर, प्रकाश आबिटकर इत्यादींची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हसन मुश्रीफ, संजय बनसोडे धर्मराव बाबा आत्राम यांना वगळले जाण्याची शक्यता आहे तर नरहरी झिरवाळ,इंद्रनील नाईक यांना मंत्री पद मिळू शकते दिलीप वळसे पाटील व छगन भुजबळ यांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा