बारामती: निरा बारामती रोडवरील कोऱ्हाळे बुद्रुक येथून दोन किलोमीटरवर असलेल्या कठीण पुलाच्या जवळ संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान एका मालवाहतूक कंटेनर व एक महिंद्रा एसयूव्ही कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एसयूव्ही कार मध्ये पाच ते सहा लोक असल्याचे सांगितले जात आहे त्यापैकी कारचालक हे गंभीररित्या जखमी आहेत, तसेच इतर चार लोकही जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. एसयूव्ही कार चे फार मोठे नुकसान झालेले दिसत आहे.

घटनास्थळापासून काही अंतरावरच असलेले पोलीस कर्मचारी आपल्या कामानिमित्त बारामती येथे जात असताना अगदी काही मिनिटातच ते घटनास्थळी पोहोचले व घटनेचे गांभीर्य ओळखून पुढील सूत्रे हलवली त्यात ॲम्बुलन्स असेल क्रेन असेल व पोलीस स्टेशनला संपर्क करून पोलीस स्टेशनला माहिती दिली.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तत्परतेने घटनास्थळी हजर होऊन अपघातात जखमी झालेल्या लोकांना प्रत्यक्ष हजर असलेले नागरिक व पोलीस यांनी दवाखान्यात पाठवले.

घडलेल्या अपघातामुळे बारामतीच्या बाजूला दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या तसेच निरा रोडच्या बाजूला एक दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस व नागरिकांच्या सहकार्याने काही वेळातच वाहतूक सुरळीत करून देण्यात आली.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा