वडगांव निंबाळकर : स्वातंत्र्य विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, वडगांव निंबाळकर येथे दिनांक १२/१२/२०२४ पासून ते १४ /१२ /२०२४ पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये दि.१२ व १३ तारखेला शाळा अंतर्गत क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.

या स्पर्धांमध्ये मुलांसाठी कबड्डी व मुलींसाठी खो-खो या सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या.
त्याच बरोबर वैयक्तिक क्रीडा स्पर्धामध्ये १०० मीटर धावणे, गोळा फेक, व लांब उडी या स्पर्धा घेण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वडगांव निंबाळकर ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ. संगीताताई शहा तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रमोद किर्वे व श्री राजेश्वर राजे निंबाळकर यांच्या शुभ हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य श्री. तांबे सर, पर्यवेक्षक श्री.बगनर सर प्रशालेच्या क्रीडा प्रमुख सौ. देशमुखे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने व सर्व शिक्षकांच्या सहकार्यांने क्रीडा स्पर्धा पार पाडल्या.

तसेच शनिवार दिनांक १४/१२/२०२४ रोजी सकाळी ठीक ८.३० वा. विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.

या कार्यक्रमास वडगांव निंबाळकर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य श्री.संजय साळवे,सौ सारिका खोमणे तसेच श्री. राजेश्वर राजे निंबाळकर,वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्री.माणिकराव गायकवाड, सेवानिवृत्त आदर्श क्रीडाशिक्षक श्री.चंद्रकांत जाधव सर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.कपिल शेंडे.उपाध्यक्ष श्री.संतोष गायकवाड,जाणता राजा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, श्री.जितेंद्र पवार.यांच्यासह पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष,पत्रकार श्री.सुशीलकुमार अडागळे व सहसचिव सौ.सृष्टी रणपिसे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी जाधव व श्री मोहन गायकवाड यांनी केले मा. प्राचार्य श्री.हेमंत तांबे सर व पर्यवेक्षक श्री.हेमंत बगनर सर यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री बाबासाहेब काळे सर, श्री अनिल पाटील सर व सर्व शिक्षक यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.उपस्थित सर्वांचे आभार शिक्षक प्रतिनिधी श्री नाळे सर यांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा