ब्रेकिंगमहाराष्ट्र
पुण्यातील नवीन सात पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या.

0
1
4
5
6
9
पुणे : पुणे शहराचा वाढता विस्तार पाहता गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने शहरात नवीन पोलीस ठाणे तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून मिळावे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याचा पाठपुरावा करण्यात आला होता. गृहविभागाने यावर निर्णय घेत पुणे पोलीस आयुक्तालयात सात नवीन पोलीस ठाणी सुरु करण्यास मंजुरी दिली, तसेच पोलीस ठाण्यात काम करण्यासाठी ८२६ पोलीस कर्मचारी उपलब्ध करून दिले. पोलीस ठाण्यांच्या इमारत उभारणीसाठी ६० कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.सात नवीन पोलीस ठाण्यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले होते.
त्यानुसार आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी ही नवीन पोलीस ठाणे सुरू झाली आहेत. पोलीस ठाण्यांसाठी जागाही निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
नव्याने सुरू झालेल्या सात पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच दिले.