गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बेकायदेशीर अमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या शेतीवर कारवाई – सुपा पोलीस स्टेशनची कारवाई
बारामती तालुक्यातील पानसरेवाडी गावाचे शिवारात शेती मालात बेकायदेशीर विनापरवाना लागवड करण्यात आलेल्या अफुच्या शेतीवर कारवाई करत एकुण ७६१०५ रूपये किंमतीची सुमारे ०८ किलो ४९७ ग्रॅम अफुच्या बोंडासह झाडे हस्तगत!

0
1
4
5
6
9
अंमली पदार्थ वनस्पतींची बेकायदेशिर विनापरवाना लागवड करून उत्पादन घेवुन विकी केल्यामुळे कमी कालावधीत झटपट पैसा कमविता येतो अशी धारणा लोकांमध्ये तयार झाली आहे. यातुनच कायद्याचा भंग करून काही लोक शेतीच्या नावाखाली शेती मालात अफु,गांज्या सारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणा-या वनस्पतींची बेकायदेशीरपणे विनापरवाना लागवड करून उत्पादन घेत आहेत. याबाबत पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधिक्षक,मा श्री पंकज देशमुख साहेब यांनी अंमली पदार्थाचे उत्पादन, साठा, विक्री व सेवन करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीसांना दिलेले होते, त्याच अनुषंगाने…
बारामती : दि.०१/०३/२०२५ रोजी सुपा पोलीस स्टेशनला मिळालेल्या गोपनीय बातमीदाराच्या माहितीनुसार पानसरेवाडी ता.बारामती जि.पुणे गावच्या हद्दीत राजेंद्र ग्यानबा कुतवळ रा.पानसरेवाडी ता.बारामती जि पुणे यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात बेकायदेशीरपणे विनापरवाना अफुच्या झाडाची विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड केलेली आहे असे समजले.या बातमीच्या आधारे बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा.सुदर्शन राठोड,यांना सांगुन त्यांचेकडुन कारवाईचे आदेश प्राप्त करून घेऊन सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मनोजकुमार नवसरे यांनी ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह पानसरेवाडी गावात जाऊन, मिळालेल्या बातमीच्या आधारे संशयित इसमाच्या शेताची पाहणी केली असता, त्यांच्या शेतामध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळुन आले.
याठिकाणी कारवाई दरम्यान एकुण ७६१०५/- रूपये किंमतीचा सुमारे ८ किलो ४९७ ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करण्यात आलेली आहेत.
दरम्यान राजेंद्र ग्यानबा कुतवळ यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.