Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र सोमेश्वर स्वयंभू शिवलिंगाचे हजारो शिवभक्तांनी घेतले दर्शन 

0 1 4 5 6 9

बारामती : श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर करंजे (ता. बारामती) येथील प्रती सोरटी सोमनाथ म्हणून प्रसिद्ध सोमेश्वर मंदिर येथे  बुधवार दि २६ रोजी महाशिवरात्रीनिमित्त स्वयंभू सोमेश्वराच्या शिवलिंग दर्शनासाठी विविध जिल्ह्यातील  भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती,महाशिवरात्री निमित्त मध्यरात्रीची महापूजा बारामतीचे तहसीलदार श्री.गणेश शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आली, यावेळी  देवस्थान ट्रस्ट चेअरमन अनंत मोकाशी ,सचिव विपुल भांडवलकर व विश्वस्त मंडळ यांच्यासह करंजे गावचे सरपंच भाऊसो हुंबरे व तसेच आजी माजी पदाधिकारी व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन रवींद्र जरांडे, दत्तात्रेय चव्हाण, हेमंत गाडगे, नितीन भोसले यांच्या मार्फत केले होते तर चिक्की व केळी वाटप बारामती येथील वकील श्रीनिवास वायकर यांनी केले होते. सोमेश्वर शिवलिंग गाभाऱ्याची आकर्षक सजावट देवस्थान ट्रस्ट ने केली होती.

 

श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखाना दरवर्षी सोमेश्वर मंदिर येथे अति महारुद्र अनुष्ठानाचे आयोजन करत असते, दिवसभर शिवभक्तांना उपवासाची खिचडी, केळी, राजगिरा चक्कीची व्यवस्था मंदिर परिसरात अनेक शिवभक्तांनी केले होते. सोमेश्वर देवस्थान मार्फत  ठिकठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाणी तसेच इतर सुख सुविधा यांची व्यवस्था करण्यात आली होती, मंदिर व मंदिर परिसरात विविध मिठाईवाले, खेळणी ,गृह उपयोगी वस्तूंचे स्टॉल लागले होते तसेच लहान मुलांना खेळण्याचे विविध पाळणेही आल्याने मंदिर व मंदिर परिसर  गजबजून गेला होता.

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी,सहाय्यक पोलीस निरीक्षक,श्री.सचिन काळे व करंजेपूल दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक,श्री.राहुल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

तसेच मंदिर परिसरात आलेल्या शिवभक्तांसाठी होळ आरोग्य केंद्र मार्फत बारामती तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांच्या सूचनेनुसार आरोग्य कर्मचारी यांनी मोफत आरोग्य सेवा बजावली.

महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवलिंगावर बेल फुल वाहत सांगता होते या अनुषंगाने भाविकांनी रात्री रांगेमध्ये उभे राहत हर हर महादेव च्या गजरात दर्शनाचा लाभ घेत असतात अशी माहिती सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट वतीने देण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे