गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
पोक्सो कायद्या अंतर्गत दोन तरूणांवर गुन्हा दाखल. वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई.

0
1
4
5
6
9
सोमेश्वर नगर: ता.बारामती येथील मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या इमारती मधून जात असताना ‘‘मिकी माउस कशी आहेस, मला तु आवडतेस” असे बोलून अश्लील हावभाव करत मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, या कारणाने एका सतरा वर्षीय महाविद्यालय युवतीने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत करंजेपूल पोलीस दूरक्षेत्र येथे आई व शिक्षकांसह जाऊन अविनाश नानासो पवार रा.वाणेवाडी ता.बारामती जि.पुणे आणि तुषार सुरेश गुलदगड रा.पळशी ता.बारामती जि.पुणे यांच्या विरुद्ध पोक्सो कायद्या अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.दोन्ही आरोपीनां पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार अविनाश नानासो पवार हा सुमारे एक वर्षापासुन तर तुषार सुरेश गुलदगड हा मागील सहा महिन्यापासुन महाविद्यालयीन युवतीचा पाठलाग करत होते, महाविद्यालय परिसरात युवती दिसल्यास अश्लिल इशारे करुन अश्लील टोमणे मारत तसेच त्या युवतीला वारंवार त्रास दिल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळुन मागील दोन महिन्यापासुन युवती एस.टी.बस ने महाविद्यालयाकडे येण्याचा प्रवास बंद केला होता,दोघांचे भीतीमुळे महाविद्यालयातील एका प्राध्यापकांच्या चारचाकी वाहनातुन महाविद्यालयात येत जात आहे.
महाविद्यालयीन युवती बस थांब्यावर येत नाही, दिसत नाही हे आरोपी यांना समजलेवर त्यांनी महाविद्यालयात येवुन त्रास देण्याचे सुरुच ठेवले होते.
या सर्व गोष्टींचा त्रास होत असल्याने युवतीची मानसिक स्थिती खुप खराब झाली आहे, अभ्यासात देखील लक्ष लागत नाही.
त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत घडलेला सर्व प्रकार महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच उपप्राचार्य यांच्याकडे बोलून दाखवला.
यानंतर पिडीतेने पोलीसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ गुन्हा दाखल केला.
सदरचा गुन्हा रजिस्टरी दाखल केला असुन गुन्हयाचा वर्दी रिपोर्ट मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना केला आहे.
पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहूल साबळे करीत आहेत.