आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
प्राचीन आयुर कर्मा पुणे,यांच्यामार्फत पुणे जिल्ह्यातील पोलिसांची आरोग्य तपासणी
वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे येथे पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन

0
1
4
5
6
9
वडगाव निंबाळकर: पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संमतीने प्राचीन आयुर कर्मा पुणे, यांच्यामार्फत पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीचे आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे करण्यात आले होते,त्यानुसार काल दिनांक १४/ १२/२०२४ रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यामध्ये सर्वात अगोदर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री.सचिन काळे यांनी आपली तपासणी करून घेतली व मोफत सल्ला तसेच मार्गदर्शन घेतले त्यानंतर काही आयुर्वेदिक औषधे खरेदी केली.
पोलीस ठाण्यातील जवळपास दोन अधिकारी व २५ कर्मचारी यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
प्राचीन आयुर कर्मा पुणे, आयोजित शिबिरात नाडी परीक्षण, प्रकृती परीक्षण, मधुमेह, नेत्र चिकित्सा,रक्तदाब योग व व्यायाम, आहार सल्ला, बीएमआय व बॉडी फॅट, यासह संपूर्ण बॉडी स्कॅनिंग आणि रक्त तपासणी करण्यात आली.
यामधील काही तपासण्या अल्प दरात व ऐच्छिक होत्या या तपासणीनंतर प्रत्येकाला एक वर्षासाठी फ्री चेकअप पास व आयुर्वेदिक औषध स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जातील अशी प्राचीन आयुर कर्मा पुणे,यांच्यामार्फत सांगण्यात आले.
या शिबिरास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सुतार, पोलीस उपनिरीक्षक,राहुल साबळे, पोहवा महेश पन्हाळे, अनिल खेडकर,हृदयनाथ देवकर,पोपट नाळे, विलास ओमासे पो.शि. प्राजक्ता जगताप तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.