आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
वडगांव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर प्रशालेचा निकाल शंभर टक्के

0
1
5
2
4
4
बारामती: स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर प्रशालेचा एस एस सी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२४-२०२५ चा निकाल शंभर टक्के लागला.
प्रशालेत एकूण ८० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी विशेष प्राविण्य मिळवलेले १७ विद्यार्थी आहेत तर प्रथम श्रेणीत येणारे २५ विद्यार्थी आणि द्वितीय श्रेणी मिळवलेले २८ विद्यार्थी आहेत यासह १० विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
प्रशालेत कुमारी माने अस्मिता सुहास ९४.६०% मिळवत प्रथम क्रमांक मिळविला तर कुमार जगताप आर्यन सुनील ९१.८०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आणि कुमारी जायपत्रे संकष्टी अशोक हिने ९१.००% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये उत्तुंग यश मिळवलेले विद्यार्थी पुढिल प्रमाणे
१) करे सानिका बापूराव- ८९.४०%
२) जाधव दिव्या रुपेश ८८.४० %
३) रणदिवे प्रार्थना अरविंद ८५.२० %
४) जगताप प्रिया नंदकुमार ८३.०० %
६) थोरात सिद्धी राजेंद्र ८२.८० %
६) दरेकर शिवरात्री गणेश ८२.८० %
७) शेख अमन युसुफ. ८१.४०%
८) खोमणे सिद्धी बाळासो ८०.४०%
प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले पहायला मिळाले असून विद्यार्थ्यांनी यशाचा मोठा जल्लोष साजरा केला.
स्वातंत्र्य विद्या मंदिर प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल गावातील ग्रामस्थांनी प्रशालेत येऊन प्राचार्य श्री तांबे सर पर्यवेक्षक श्री.बगनर सर त्याचबरोबर सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे अभिनंदन केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर यांच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.राहुल जाधव, व्यवस्थापन समितीचे सदस्य समीर आतार आणि शाळेचे उपशिक्षक श्री.अनिल गवळी यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष आणि स्वातंत्र्य विद्या मंदिर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.सुशीलकुमार अडागळे यांनी प्रशालेत येवून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्राचार्य श्री.हेमंत तांबे सर यांच्यासह सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
प्रशालेचा गुणवत्तापूर्ण निकाल लागल्याने व प्रशालेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे याबद्दल प्रशालेचे प्राचार्य श्री.हेमंत तांबे यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्व विद्यार्थी,शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती यांच्यासह प्रशालेसाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
दरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचे औचित्य साधून आज श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती व अनिल गवळी गुरुजी तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री.तांबे सर यासर्वांच्या उपस्थितीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.