बारामती: बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नुकताच सुरेंद्र निकम यांनी पदभार स्वीकारला सोमवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी कार्यालयीन कामाचा आढावा घेत सहकारी तसेच कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या व आपल्या कामकाजाची सुरुवात केली.

बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात बारामती, इंदापूर, दौंड, या तीन तालुक्यांचा समावेश येतो या तालुक्यातून वाहनांच्या कामासंबंधी बरेच वाहनधारक येथे येत असतात, वाहन परवाना ते वाहन हस्तांतरणासह अनेक प्रकारच्या कामांसाठी नागरिकांचा या कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणावर ये जा असते.

बारामती शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने येथे गावागावातून लोक विविध कामांसाठी येत असतात याच निमित्ताने बारामतीतील रस्त्यांवर पार्किंग व बेशिस्त पार्किंगसह वाहतुकीची शिस्त हा सर्वात पहिला प्रश्न आहे,
येणाऱ्या काळात वाहतूक नियमासंबंधी जनजागृती तसेच प्रबोधन करून वाहतुकीला शिस्त लावली जाणार की फक्त दंडात्मक कारवाई करून बगल दिली जाणार हा कळीचा मुद्दा आहे.

एकूणच कार्यक्षेत्राच्या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी काही ठोस उपाययोजना होणार का किंवा यासाठी काही विशेष मोहिमा हाती घेतल्या जाणार हे बारामतीकरांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुढील काही महिन्यात निवडणुकीसह साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होणार आहे ट्रक किंवा ट्रॅक्टर तसेच बैलगाडीवर ऊस वाहतूक करणाऱ्यांसाठी काय नियमावली व काय शिस्त असणार आहे हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
अवजड वाहनांना तसेच दुचाकींना क्रमांक नसणे, वाहनांवर क्रमांक नसणे, अवैध वाहतूक, ट्रॅक्टरला तीन किंवा त्यापेक्षा जास्त ट्रॉली जोडून वाहन चालवणे, विनापरवाना वाहन चालवणे,अवजड वाहतूक, तसेच खडी, दगड अशी वाहतूक करणारे हायवा यासारख्या वाहनांना वाहतुकीची शिस्त लागणार का?
की फक्त परिवहन महसूलाचे उद्दिष्ट ठेवून कामकाज होणार हेही पाहण्यासारखे आहे.
तालुक्यातील वाहन अपघातांचे वाढलेले प्रमाण कसे रोखता येईल किंवा कमी करण्यासाठी तसेच रस्ते सुरक्षा नियमांसाठी काही उपाययोजना होणार का? आणि त्यावर काटेकोर अंमलबजावणी होणार का?
हे परिवहन अधिकारी यांच्यासमोर महत्वाचे आव्हान ठरणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा