आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीचे नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष.
वारंवार तक्रार करूनही नगरपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष.

0
1
4
5
6
9
माळेगाव बुद्रुक: तालुका बारामती जिल्हा पुणे येथील नगरपंचायत हद्दीतील येळेवस्ती येथे पाण्याच्या टाकीजवळ खड्ड्यामध्ये पाणी साठून राहिलेले आहे.
यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना पाण्याची दुर्गंधी येत आहे.तसेच साचलेल्या पाण्यामध्ये डास आणि डास सदृश्य किटक झालेले आहेत.त्यामुळे येथील नागरिकांना चिकनगुनिया, डेंगू, गोचीडताप, आजार झालेले आहेत.
येळेवस्ती ग्रामस्थांनी नगरपंचायतकडे वारंवार तक्रार करून देखील नगरपंचायत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे.
चिकनगुनिया, डेंगू, गोचीडताप, यासारख्या आजारांमुळे ग्रामस्थांना नाहक दवाखान्याचा खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.या आजारांमुळे एखाद्याचा जीव गेला तर याला कोण जबाबदार असेल? असा प्रश्न यानिमित्ताने नागरीक विचारात आहेत.