ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची राज्य कार्यकारणी जाहीर

0
1
4
5
6
9
बारामती: गेली आठ वर्ष वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अखंड व अविरत रुग्णसेवेमध्ये कार्यरत आहे आता रुग्णसेवेचा विस्तारही खूप मोठा झालेला आहे.राज्यातील सुमारे 32 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय मदत कक्षाची स्वतंत्र अशी कार्यालये तसेच जवळपास पाच हजाराहून अधिक पदाधिकारी या मदत कक्षाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या राज्यातील सर्व हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या शस्त्रक्रिया/उपचार होण्यासाठी कक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा केला जातो. याशिवाय संबंधित रुग्णालय,गरजू रुग्ण,आणि विविध ट्रस्ट यांच्यातील “दुवा” म्हणून शिवसेनेचा हा कक्ष काम करतो.तसेच गंभीर आजार असलेल्या रुग्णास कक्षाच्या माध्यमातून शस्रक्रियेसाठी मदत केली जाते.
आतापर्यंत कक्षाच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यात वेगवेगळी आरोग्य शिबिरे तसेच मोफत व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया, दोन लाखाहून अधिक चष्मे वाटप, दहा हजाराहून अधिक लहान मुलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत आणि अशा प्रकारची रुग्णसेवा ही शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून नेहमीच चालू आहे व असते.या पुढेही हि रुग्णसेवा अशीच जोमाने सुरू रहावी म्हणून व राज्यातील गोरगरीब गरजु जनतेला वैद्यकीय मदत मिळत रहावी तसेच कक्षाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातून अधिकाधिक आरोग्य सहायक, रूग्ण सेवक जोडून कक्षाची वाढ व विस्तार अधिक जोमाने कसा करता येईल यासाठी म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची नुकतीच मुंबईत एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला वैद्यकीय मदत कक्षाची निर्मिती करण्यात यावी अशी संकल्पना मांडणारे व ती गोष्ट सत्यात उतरवणारे तसेच मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी असणारे श्री.मंगेशजी चिवटे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीमध्ये वेगवेगळे ठराव मंजूर करण्यात आले त्यामध्ये कक्षाची वाढ,विस्तार त्याचबरोबर वैद्यकीय मदत कक्षात काम करताना येणाऱ्या अडचणी या संदर्भात चर्चा करण्यात आली व त्याच बरोबर राज्य कार्यकारिणीत काही बदल व काही नविन नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने आतापर्यंत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने राज्य प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे श्री.राम हरी राऊत यांची सर्वानुमते ‘कार्याध्यक्ष’म्हणून निवड करण्यात आली.
यांच्यासह इतर राज्य कार्यकारिणी खालीलप्रमाणे..
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्य कार्यकारिणी
श्री. रामहरी भिमराव राऊत (कार्याध्यक्ष)
श्री. माऊली धुलगंडे, सचिव
श्री. प्रथमेश पाटील,सचिव
विभागीय सचिव
श्री. जितेंद्र गवळी,सचिव (उत्तर महाराष्ट्र)
श्री. गौरव गुळवणी,सचिव (पश्चिम महाराष्ट्र)
श्री. चंद्रशेखर चड्डे,सचिव (पूर्व विदर्भ)
श्री. माधव वानखेडे,सचिव (पश्चिम विदर्भ)
श्री. गजानन ठाकूर,सचिव मराठवाडा (नांदेड, हिंगोली, परभणी)
श्री. शशिकांत वाघे,सचिव (कोकण विभाग)
विभागीय संपर्क प्रमुख
श्री. अमित वरणकर,पश्चिम विदर्भ
श्री. प्रवीण शर्मा,पूर्व विदर्भ
श्री. सुरज जम्मा,पश्चिम महाराष्ट्र (पुणे, सोलापूर, धाराशिव)
श्री. गजानन गिरी,मराठवाडा (नांदेड, हिंगोली, परभणी)
श्री. प्रशांत साळुंके,पश्चिम महाराष्ट्र (सांगली, सातारा, कोल्हापूर)
श्री. राज गुहागरकर,मुंबई विभाग (दक्षिण, पश्चिम)
श्री. हनुमंत पाटील,मराठवाडा (स. नगर, जालना, लातूर)
राज्य कार्यकारिणी सदस्य
श्री. गणपती कांबळे,सदस्य
श्री. रणजीत परदेशी,सदस्य
श्री. अमोल पाटील,सदस्य
श्री. निखील बुडजडे,सदस्य
श्री. योगेश म्हस्के,सदस्य
सौ. सिमा कल्याणकर,सदस्य
सौ. सोनालीताई देशमुख,सदस्य
श्री. चिराग आनंद,सदस्य
श्री. धनंजय पवार,सदस्य (न्यायीक सल्लागार)
श्री. भूषण सुर्वे,सदस्य (सोशल मीडिया)
वरील सर्व पदाधिकाऱ्यांची राज्य कार्यकारणीत निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर संपूर्ण राज्यातून पदाधिकारी व सदस्य यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.व आपल्या सर्वांच्या माध्यमातून राज्यातील अनेक गोरगरीब गरजु जनतेला वैद्यकीय सहाय्यता मिळावी व जनतेची सेवा घडावी हि अपेक्षा करण्यात येत आहे.