
बारामती : हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्हे (ता. पुरंदर ) गावात हजरत दावल मलिक दर्गा शरीफच्या तीन दिवशीय उरूसाला संदल मिरवणुकीने सुरवात झाली.

यावेळी पीर दावल मलिक दर्ग्याचे मानकरी असलेल्या तांबोळी परिवाराकडून उरुसाच्या पहिल्या दिवसाच्या सायंकाळी दर्गा संदल निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दातेवाडी फाट्यानजीक पालखी महामार्गालगतच्या दर्गास्थळा पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बारामती येथील बँड पथकाने विविध गाणी वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

त्यानंतर मुस्लिम समाजासह इतर धर्मियांकडून ,दर्गा समाधीची विधिवत पूजा करून त्यावर फुलांची चादर चढविण्यात आली.,
यावेळी इतरही धार्मिक कार्यक्रमांनी उरुसाला सुरवात करण्यात आल्याने बाहेर गावाहून आलेल्या भाविकांसह ग्रामस्थांनी हजरत दावल मालिकांच्या दर्गा समाधीच्या दर्शनासाठी गर्दी केली.

या धार्मिक कार्यक्रमात खुदबुद्दीन तांबोळी आरिफ तांबोळी मोहसीन शिकलगार जमीर तांबोळी दिलनवाज कुरेशी अमर तांबोळी शाही सुन्नी मस्जिद ट्रस्टचे संस्थापक सिकंदर नदाफ ऋषिकेश राऊत डॉ. अभिष भुजबळ आदींचा सहभाग होता.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा