वडगाव निंबाळकर: पोलीस स्टेशन अंकित करंजेपुल पोलीस दूरक्षेत्र येथे गुन्हा नोंद झालेल्या हकीकतीप्रमाणे राहुल कांतीलाल बोराडे राहणार रांजणगाव, तालुका शिरूर,हे दिनांक ७/१०/२०२४ रोजी बिग बॉस विजेत्या सूरज चव्हाण जिथे राहतो त्या गावी म्हणजेच मोढवे तालुका बारामती येथे भेटण्यासाठी आले होते, सुरज चव्हाण च्या घरी त्यांच्या अगोदर त्यांचे भाऊ संजय कांतीलाल बोराडे व त्यांचे मित्र अजय खलसे, अविष्कार खोमणे, आदिनाथ बोडरे, हे आलेले होते राहुल बोराडे हे सकाळी लवकर आल्याने त्यांनी व त्यांचे भाऊ त्यांचे मित्र यांनी मिळवून सुरज चव्हाणचे घर तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून घेतला त्यानंतर ते सर्वजण गावात फिरायला गेले फिरून रात्री ०९ ते ०९/३०च्या दरम्यान गावातील सुप्रसिद्ध मरीमाता मंदिरासमोर गप्पा मारत बसले होते दरम्यान राहुल बोराडे हे लघुशंकेसाठी बाजूला जात असताना मंदिराच्या मागून एका मोटरसायकल वरून चार मुले आली त्यातील एकाला राहुल बोराडे हे ओळखत होते त्यांनी तुम्ही सुरज चव्हाण ला भेटण्यासाठी का आला? असे म्हणून त्याच्यातील एकाने बोराडे यांच्या डोक्यात लाकडी दांडके मारले दुसऱ्याने लाकडी काठीने डोक्यावर,पायावर, मारहाण केली व इतर दोघांनी हाताने तसेच लाथा बुक्क्याने मारहाण करीत शिवीगाळ तसेच दमदाटी केली चौघांपैकी एकाने बोराडे यांचा मोबाईल फोडून नुकसान केले.
मारहाण होतेय हे पाहून राहुल बोराडे यांचे भाऊ व त्यांचे मित्र मदतीसाठी आले असता ते चौघेजण आलेल्या वाहनांवर बसून पळून गेले.
मारहाणीत दुखापत झाल्याने त्यांचे भाऊ व मित्रांनी त्यांना मोरगाव तालुका बारामती येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले परंतु तेथे पोलिसांचे पत्र आणा असे सांगितल्याने बोराडे भाऊ व त्यांचे मित्र जेजुरी येथील सरकारी दवाखान्यात गेले तेथे उपचार घेऊन ते परत आले परंतू रात्र झाल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे ०८/१०/२०२४रोजी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित करंजेपुल दूरक्षेत्र येथे जाऊन मारहाण करणारे तुकाराम सदाशिव खोमणे, शुभम तुकाराम खोमणे,गौरव धोंडीबा खोमणे, ऋषिकेश वैभव नानावटे सर्व राहणार मूर्टी,तालुका बारामती यांच्याविरुद्ध तुम्ही सुरज चव्हाणला भेटायला का आले असे म्हणत लाकडी दांडक्याने, हातापायाने, काठीने मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी केल्याने व तुकाराम चव्हाण यांनी मोबाईल फोडून नुकसान केले म्हणून वरील चौघाविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे.
“गुन्हा नोंद झाला, तपास होईल, कारवाई होईल,
परंतु

एक असं व्यक्तिमत्त्व ज्याची कोणतीही कौटुंबिक,शैक्षणिक,आर्थिक पार्श्वभूमी नसलेलं, स्वतः सोबत इतरांचं मनोरंजन करत करत बिग बॉस मराठी सारख्या व्यासपीठावर जाऊन पोहोचलं आणि ते व्यासपीठ गाजवलं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आपलं स्थान मिळवलं महाराष्ट्रातील जनतेने त्याला स्वीकारलं ते व्यक्तिमत्व महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध झालं, गावासह तालुका जिल्हा व राज्याचे नाव मोठं केलं,
सर्वांनी स्वीकारलं पण….

‘तुम्ही सुरज चव्हाणला भेटण्यासाठी का आला’?
या प्रश्नाचा, प्रश्न उपस्थित होत आहे”?


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा