बारामती : बारामती येथील प्रगतीनगर येथे क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय रस्त्यावर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका 23 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण पद्धतीने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हकीकत अशी आहे की रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय रस्त्यावर अनिकेत सदाशिव गजाकस वय 23 वर्षे या युवकाचा धारदार शास्त्रांनी वार करण्यात आले व यात तो गंभीर जखमी झाल्याने अनिकेत गजाकस याचा मृत्यू झाला.

फिर्यादीतील माहितीनुसार अनिकेत हा परिसरातील मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून अनिकेतवर हल्ला करण्यात आला आहे.अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

अभिषेक सदाशिव गजाकस यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद दिली असून, पोलिसांनी तिघाजणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात नंदकिशोर पंजाबराव अंभोरे रा. प्रगतीनगर ता. बारामती महेश नंदकुमार खंडाळे, रा. जिजामातानगर तांदुळवाडी बारामती, संग्राम खंडाळे (पूर्ण नाव पत्ता नाही) या तिघांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
घटना घडताच पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचली होती परंतु तीनही आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे.
पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गजानन चेके करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा