बारामती : दिनांक ०१/०१/२०२५ रोजीचे कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे हजर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आज दिनांक २८/१२/२०२४ रोजी सकाळी १०:३० वा ते सकाळी १२.३० च्या दरम्यान जातीय दंगा योजना (मॉब ड्रिल) चा वडगांव निंबाळकर पोलीस मैदानावर सराव घेण्यात आला.

यामध्ये वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री.सचिन काळे यांनी गर्दीवर नियंत्रण कसे मिळवावे किंवा दंगा झाल्यास दंग्यावर कशा पद्धतीने काबू मिळवावा याविषयी सूचना केल्या तसेच गर्दी किंवा एकूणच झालेला दंगा कशा पद्धतीने हाताळावा याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन काळे,पोलीस उपनिरीक्षक,श्री दिलीप सुतार, पोलीस उपनिरीक्षक श्री.राहुल साबळे यांच्यासह पोलीस हवालदार श्री पन्हाळे श्री अनिल खेडकर, पोपट नाळे, हृदयनाथ देवकर, सूर्यकांत कुलकर्णी, कॉन्स्टेबल,आबा जाधव, यांच्यासह ठाण्याचे इतर पोलिस कर्मचारी तसेच महिला पोलीस उपस्थित होत्या.

सराव नंतर करंजेपुल येथे सोमेश्वर कारखाना रोड ते सोमेश्वर चौक,आणि वडगांव निंबाळकर येथे महात्मा फुले चौक ते सावतामाळी चौक या ठिकाणी पथसंचलन करण्यात आले.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा