अ.नगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी : फॅक्टरी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
भारताला बौद्धमय करण्याचे स्वप्न अधुरे ठेवून तसेच सामाजिक उत्थान होण्याचे कार्य समाजबांधवांवर सोपवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्राणज्योत दि.६डिसेंबर १९५६ साली मालवली.

अशा युगायुगातुन एकदाच जन्मास येऊन जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करणारे महामानव यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर भागातील डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी तैन्नूर भाई पठाण, सुनील विश्वासराव सचिन सरोदे, सनी जगताप, पत्रकार राजेंद्र साळवे, प्रवीण पाळंदे, सुनील साळवे, विठ्ठल देवरे, पास्टर फ्रान्सिस विधाटे,विजय जाधव, बाळू मोकळ, चिंतामण कांबळे, नितीन पुंड,शरद साळवे, प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ पवार, शिक्षक पवार, यांच्यासह विद्यार्थी पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पुढे पत्रकार राजेंद्र साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
एवढ्या वर्षात आम्ही इथपर्यंत पोहोचलो.ही खऱ्या अर्थाने महामानवांची प्रेरणादायक विचारसरणी आहे.ती अविरत चालत रहावी.आपल्या प्रगतीबरोबरच समाजबांधवांना पण एक हात मदतीचा देउन त्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गरजेचे आहे.
धम्मचक्र गतीमान करण्याचे कार्य, सामाजिक शिस्त, समाजाचे एकत्रिकरण, राजकीय वारसदार होण्याचे कार्य, राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा निर्माण करण्याचे कार्य असे अनेकविध कार्य आपणास करायचे आहे.
आजच्या दिवशी आम्हास हे कार्य करुन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली अर्पण करावी अशी प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा