Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्र

राहुरी येथील विवेकानंद नर्सिंग होमच्या कामगारांचे  विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरु 

0 1 4 5 6 9

अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी

राहुरी : डॉ. बाबुराब बापुजी तनपुरे साखर कारखाना संचलित विवेकानंद नर्सिंग होमच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पदोन्नती, महागाई भत्ता व पगार वाढिसाठी धरणे आंदोलन  सोमवार दि.3 पासुन सुरु झाले आहे.प्रशासनाच्या वतीने आंदोलकांशी चर्चा करुन आंदोलना पासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.परंतू आंदोलकांनी आमच्या मागण्या मान्य करा तरच आंदोलन थांबवले जाईल असे स्पष्ट सांगितल्याने आंदोलक व प्राचार्य यांच्यात झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे.

               विवेकानंद नर्सिंग होमचे प्राधिकृत अधिकारी यांना काही दिवसापूर्वी निवेदन देवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.कामगारांच्या मागण्यावर प्राधिकृत अधिकारी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसल्याने कामगारांनी काल पासुन धरणे आंदोलन सुरु केले आहे.

           आंदोलनकर्ते कामगार आयुर्वेद महाविदयालयात कायमस्वरुपी २० ते ३० वर्षापासून काम करीत आहेत. संस्थेने दिलेल्या नेमणूक पत्रानुसार महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम व वेळोवेळी होणाऱ्या शासनाच्या बदलाप्रमाणे मिळणारे लाभ महागाई भत्ता, पदोन्नती, घरभाडे हे शासनाच्या नियमाप्रमाणे मिळतील असे शासनाच्या नेमणूक पत्रात नमूद केलेले आहे. परंतु अद्यापर्यंत कुठलाही लाभ दिलेला नाही. आमची सेवा ही नियमित सलग व स्वच्छ आहे. मात्र हा लाभ संस्थेतील काही मर्जीतील कर्मचा-यांना वेळोवेळी देण्यात आलेला आहे. त्यामुळे  उर्वरीत कर्मचाऱ्यांवर  खूप मोठा अन्याय होत आहे. कर्मचाऱ्यां बाबत भेदभाव केला जात आहे.

              कर्मचाऱ्यांनी यापुर्वी वारंवार आपल्याला लेखी व तोंडी मागणी करुन मागण्या बाबत कुठलाही विचार झालेला नाही. माहे ऑगष्ट व सप्टेंबर २०२३ महिण्याचा २१ दिवसांचा पगार  अनाधिकृतपणे पेंडींग ठेवलेला आहे. सध्याच्या वाढत्या महागाईमुळे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. एवढ्या कमी पगारावर कुंटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकरीचे होवून बसले आहे. याप्रश्नी न्याय न मिळाल्याने  नाईलाजास्तव संस्थेच्यासमोर धरणे आंदोलन करावे लागत आहे. असे कामगारांनी सांगितले.

             या आंदोलनात राजेंद्र लांबे, प्रमोद साळुंखे, सुदाम भागवत ,गजानन वराळे, गोविंद पठारे, अशोक उगले,भगवान म्हसे, राजेंद्र साळुंखे,योगेश जाधव,विजय डुकरे,  सोनाली म्हस्के, नवनाथ तारडे, ज्ञानेश्वर टिक्कल,विमल हुडे, दत्तात्रय मोरे यांच्यासह आयुर्वेद महाविद्यालय कॉलेज, बी फार्मसी व नर्सिंग कॉलेजचे सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत.

               प्रशाकीय अधिकारी म्हणून प्राचार्य डाँ.अनंतकुमार शेकोकर यांच्याकडे आंदोलना बाबत वीचारणा केली असता कामगारांबरोबर बैठक घेतली पण कामगार प्रशासनाची भुमिका समजुन घेण्याच्या मनस्थित नाही. कामगारांना कामाबाबत शिस्त व संस्थेच्या आर्थिक धोरणात शिस्त लावल्याने काही कामगारांची मने दुःखावली गेली आहे. सर्वच दिशाभुल करुन ठरावीक कामगारांनी हे आंदोलन सुरु केले आहे. कामगारांच्या आंदोलना संदर्भात प्राधिकृत अधिकारी निर्णय घेतील असे प्राचार्य डाँ शेकोकर यांनी सांगितले.

  पगारवाढीला स्थगिती दिली आहे.

संस्थेत यापुर्वीच्या प्राधिकृत अधिकारी यांनी मर्जितील कर्मचाऱ्याला बेकायदेशीरपणे पगार वाढ व पदोन्नती दिल्याचा आरोप कामगारांनी केलेला असला तरी त्या कामगारांच्या पगारवाढीला यापूर्वीच स्थगिती दिली आहे.असे प्राचार्य व प्रशासकीय अधिकारी डाँ.अनंतकुमार शेकोकर यांनी सांगितले.

पद प्राचार्याचे पगार प्राध्यापकाचा घेतो!

आर्युवेद महाविद्यालयात एक दोन महिण्यापुर्वीच माझी प्राचार्यपदी नियुक्ती झाली आहे. ज्या दिवशी मी प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला त्याच दिवसा पासुन माझ्या पगारात ३६ हजार रुपयांची वाढ झाली.परंतू हि वाढ मी घेतलेली नसुन तसे लेखी पत्र संस्थेला दिले आहे. मी जरी प्राचार्य पदावर असलो तरी पगार मात्र प्राध्यपकाचा घेत आहे. संस्थेचे  ३६ हजार रुपयांची बचत केली असून ती माझ्या पासून सुरवात केली आहे.असे प्राचार्य डाँ.अनंतकुमार शेकोकर यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे