Breaking
अपघातगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नऊ वर्षाच्या मुलाचा बापानेच केला खून बारामती तालुक्यातील घटनापोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा झाला उघड

0 1 4 5 6 9

बारामती : तु अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतोस, तु तुझ्या आईच्या वळणावर गेला आहेस,माझी इज्जत घालवणारा दिसतोय असे म्हणत बापाने मुलाला भिंतीवर आपटले व नंतर त्याचा गळा दाबून खून केल्याची घटना होळ ता. बारामती येथे घडली आहे.

याबाबत पोलिसांनी विजय गणेश भंडलकर, शालन गणेश भंडलकर, संतोष सोमनाथ भंडलकर सर्व रा. होळ ता. बारामती जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ जानेवारी रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास नऊ वर्षांचा पियुष घरात असताना वडील विजय भंडलकर याने तु घरात येऊन अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतोस तु तुझे आईच्या वळणावर जावुन माझी इज्जत घालवणारा दिसतोय असे म्हणत पियुषला भिंतीवर आपटले व त्याचा गळा दाबून खून केला.

पियुष ची आज्जी शालन गणेश भंडलकर यांनी सदरची घटना पाहुन देखील विजय भंडलकर यास हे कृत्य करताना त्यास प्रतिबंध केला नाही.

व त्याच्या सांगण्यानुसार पियुष हा चक्कर येवुन पडला आहे अशी खोटी माहिती दिली,

तसेच यातील पियुषचा चुलत चुलता संतोष भंडलकर यास हि घटना समजली, त्याने व पियुष च्या आई-वडिलांनी त्याला निरा येथे दवाखान्यात घेऊन गेले  तेथे विजय भंडलकर यांचे सांगण्यानुसार पियुष हा चक्कर येवुन पडल्याची खोटी माहिती दिली. डॉक्टरांनी पियुष हा मयत झाल्याचे सांगितले व  पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेवुन जाण्यास सांगितले.

विजय भंडलकर याने पियुष यास त्याचा गळा दाबुन त्यास आपटुन जिवे ठार मारून त्याचा खुन केला आहे ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. व त्याबाबतचा पुरावा राहता कामा नये यासाठी त्याचे मृत शरीर प्राथमिक आरोग्य केंद्र होळ येथे घेवुन न जाता, संगनमताने व जाणिवपूर्वक  त्याचे प्रेत गावी घरी नेले, इतर कोणालाही या बाबतची माहिती कळविली नाही. व त्यांनी त्याचे नातेवाईक बोलावुन घेवुन मयत पियुष याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे पोस्टमार्टम न करता त्याचा अंत्यविधी करण्याची तयारी केली होती.

त्याचा अंत्यविधी करण्याची तयारी करुन त्याचे प्रेत स्मशानभुमी होळ येथे घेवुन जाऊन विजय भंडलकर यास शालन भंडलकर व संतोष भंडलकर यांनी सदर गुन्हयास साहय केल्याने, विजय गणेश भंडलकर ,शालन गणेश भंडलकर, संतोष सोमनाथ भंडलकर  सर्व रा.होळ ता.बारामती जि.पुणे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा. कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्यात आला असुन,अधिकचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे