
बारामती, दि. २७ प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलिस वाहतूक शाखा, रायडर हब व ड्रायविंग स्कूल संघटनेच्या सयुंक्त विद्यमाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय-पेन्सिल चौक, तीन हत्ती चौक, गुणवडी चौक व कसबा चौक-उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यादरम्यान दुचाकीवर हेल्मेट व चारचाकी चालवितांना सीटबेल्ट वापरण्याबाबत जनजागृती फेरी आयोजित करण्यात आली.

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.सुरेंद्र निकम आणि वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री.चंद्रशेखर यादव, ड्रायविंग स्कूल संघटनेचे मालक व चालक आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. निकम म्हणाले, नागरिकांनी वाहने चालविताना हेल्मेट व सीटबेल्ट वापरण्याबाबतच रस्ता सुरक्षा नियमांचेही काटेकोरपणे पालन करावे. रस्ते अपघात टाळून अपघात मुक्त परिसर करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे, याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. निकम यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा