ब्रेकिंगमहाराष्ट्र
आचारसंहिता कालावधीत शासकीय, सार्वजनिक मालमत्तेवर पूर्वपरवानगीशिवाय प्रचारसहित्य प्रदर्शित करण्यास निर्बंध

0
1
4
5
6
9
पुणे,दि. १८ : आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपीकरणाची शक्यता लक्षात घेऊन सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगी शिवाय जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिरात प्रदर्शित करण्यास निर्बंध घालण्यात आल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमित केले आहेत.