बारामती: वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लाडके संवेदनशील मा. उप-मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्री.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून श्री मंगेश चिवटे सर संस्थापक अध्यक्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख व श्री रामहरी राऊत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली मा जिल्हाप्रमुख श्री महेश दादा पासलकर यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या दिव्यांग बांधवांना पाय नाहीत अशा दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम पाय रोपण शिबिरांचे आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व महिला आघाडी पुणे जिल्हा यांच्या सौजन्याने इंदापूर येथे लवकरच करण्यात येणार आहे.

या शिबिराची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहचवावी असे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबिराविषयी आपल्या भागातील हात आणि पाय नसलेल्या लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होईल.
त्यासाठी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत याचा प्रसार करावा व हि माहिती पोहचवावी असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नाव नोंदणीसाठी खाली दिलेल्या पदाधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.

सौ.सीमा प्रशांत कल्याणकर
शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य,-9850001755
श्री विशाल धुमाळ, उपजिल्हा समन्वयक- 90963 24212
श्री सागर आवटे,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, इंदापूर तालुका – 99708 48454
अँड श्री आनंद केकाण, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, इंदापूर तालुका – 99602 50400
श्री सोमनाथ लांडगे,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष इंदापूर तालुका – 9503521111

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा