Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्र

रोटरी आरसीसीच्या अध्यक्षपदी संदीप जगताप तर सचिव म्हणून सिकंदर शेख यांची निवड.

0 1 4 5 6 9

बारामती: रोटरी क्लब ऑफ बारामती पुरस्कृत बारामती तालुका शिक्षकांचा रोटरी कम्युनिटी कॉर्पस (RCC) ची स्थापना करण्यात आली असून या आरसीसीच्या अध्यक्षपदी बारामती तालुका मुख्याध्यापक संघांचे सचिव संदीप जगताप यांची तर आरसीसीच्या सचिवपदी तालुका मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष सिकंदर शेख यांची निवड करण्यात आली.

विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली असून आरसीसी चे अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि इतर सदस्यांचा पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी  RCC चे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो. सुबोध मालपाणी व डिस्ट्रिक्ट अव्हेणु सेक्रेटरी रो.आनंद कुलकर्णी व को-डायरेक्टर रो. पार्श्वेन्द्र फरसोले, बारामती रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री अरविंद गरगटे, सचिव श्री रविकिरण खारतोडे व इतर सर्व सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी RCC च्या २४-२५ वर्षा करीता अध्यक्ष म्हणून श्री.संदीप जगताप,सचिव श्री सिकंदर शेख, तर खजिनदार श्री हेमंत तांबे, यांची निवड करण्यात आली.दरम्यान अध्यक्षपदाची कॉलर व इतर सदस्यांना RCC ची पिन देण्यात आल्या.

शिकवण्याला इंग्रजी मध्ये ‘टीच’ म्हणतात यातील टी म्हणजे शिक्षकांना सामर्थ्यशाली बनविणे, इ म्हणजे आधुनिक काळातील डिजिटल शिक्षण प्रणाली आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण सुलभ करणे, ए म्हणजे मुलांबरोबर प्रौढाचे शिक्षण सुरु ठेवणे, सी म्हणजे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे तर एच म्हणजे शाळांमधील वातावरण आनंदी करणे असे असून रोटरीच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा एक व्यापक उपक्रम असल्याचे मत सुबोध मालपाणी यांनी व्यक्त केले.

समाजाच्या गरजा ओळखून त्या रोटरीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न रोटरी क्लब मार्फत केला जातो. शिक्षण हे समाज बदलाचे प्रमुख माध्यम असल्याने शिक्षकांचा समूह तयार करून विध्यार्थी आणि शिक्षकांसाठी काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री सुबोध मालपाणी यांनी केले.

RCC च्या माध्यमातून बारामती तालुक्यातील शिक्षणासंदर्भातील विविध गरजाचे निवारण  करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन पदग्रहण करताना श्री संदिप जगताप यांना दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.अजय दरेकर यांनी केले तर आभार श्री रविकिरण खारतोडे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे