बारामती : नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत देशात रस्ते अपघातातील मृतांची संख्या वाढल्याची कबुली प्रश्नोत्तराच्या तासात दिली होती. त्यात त्यांनी असे सांगितले दरवर्षी १ लाख ७८ हजार मृत्यू हे रस्ते अपघातात होतात. त्यातील ६० टक्के मृत्यू १८ ते ३४ वयोगटातील आहेत.
ही गोष्ट अतिशय चिंताजनक आहे रस्ते अपघातांचे प्रमाण निम्म्याने कमी करण्याचे ध्येय केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्रालयाने ठेवले होते मात्र वार्षिक सुमारे दीड लाख मृत्यूमध्ये वाढ होऊन ते १ लाख ७८ हजार लाख झाले आहेत. सर्वाधिक रस्ते अपघात उत्तर प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये होत आहेत ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे.
याच अनुषंगाने रस्ते सुरक्षा अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.
रस्ता सुरक्षा अभियान २०२५ याची सुरुवात १ जानेवारी २०२५ रोजी झाली यानिमित्ताने मा.उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार यांच्या हस्ते रस्ते सुरक्षा प्रबोधनानिमित्त पुस्तक प्रकाशित करण्यात आले. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती यांच्या वतीने श्री.सुरज पाटील आरटीओ इन्स्पेक्टर हे उपस्थित होते.

मेडिकोज गिल्ड ही बारामती शहर आणि परिसरामध्ये वैद्यकीय व्यवसाय करीत असलेल्या डॉक्टरांची संघटना आहे १९७४ साली स्थापन झालेल्या या संस्थेस पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत व संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत वैद्यकीय क्षेत्राबरोबरच विविध समाज उपयोगी उपक्रम संस्थेतर्फे यापूर्वी वेळोवेळी आयोजित करण्यात आलेले आहेत याद्वारे सामाजिक उत्तरदायित्व जपण्याच्या संस्थेने नेहमीच प्रयत्न केलेला आहे
सध्याच्या काळात एकंदरीत सर्व वाहनांची वाढलेली संख्या आणि दळणवळणाची वाढलेले प्रमाण पाहता दुर्दैवाने रस्ते अपघात आणि त्यामध्ये जखमी,अपंग किंवा मृत होण्याच्या प्रमाणात चिंताजनक अशी वाढ झालेली दिसून येते, बेजबाबदारपणे आणि अति वेगाने वाहन चालवणे,व्यसन करून वाहन चालवणे, वाहनांची स्थिती योग्य नसणे या कारणाबरोबरच रस्ते सुरक्षा या विषयाबाबतचे अज्ञान हेही या दुर्घटनांचे मुख्य कारण असल्याचे दिसते, रस्ते सुरक्षा विषयांतर्गत वाहतुकीचे नियम,रस्ता चिन्हे, इशाऱ्याबद्दल माहिती याबाबतचे अज्ञान किंवा अनास्था दूर व्हावी आणि रस्ता सुरक्षा नियमांची पालन व्हावे यासाठी जनजागृती करण्याचा उद्देशाने या पुस्तिकेच्यी निर्मिती करण्यात आलेली आहे.

शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर मुला-मुलींना रस्ते सुरक्षा या विषयाबाबत या पुस्तिकेच्या माध्यमातून माहिती देऊन याबाबतची त्यांची सजगता वाढावी या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम हाती घेतलेला आहे.
या गंभीर विषयाबाबत योग्य वयात जागरूकता निर्माण होऊन रस्ते अपघात त्यातील पीडित किंवा मृत यांची संख्या अल्प प्रमाणात कमी करण्यासाठी जरी मदत झाली तरी या पुस्तकाच्या निर्माणामागील उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.

या पुस्तिकेमधील माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा चिन्हे आणि इशारांवरील पुस्तक या पुस्तकांमधून घेण्यात आलेली आहेत



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा