अ.नगर जिल्हा प्रतिनिधी
देवळाली प्रवरा – दि.०७/११/२४
डी.एम.सी. दूध संकलन आणि शीतकरण केंद्र या चिलिंग प्लांट ची २४ तासात विज व पाणी तोडण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने नुकतेच आदेश दिले होते.
अहिल्यानगर जिल्हयातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा येथील बेलापूर रोडवरील गट नं. १६१३/१/अ मध्ये सुरु असलेल्या डी.एम.सी. दूध संकलन आणि शीतकरण केंद्र या चिलिंग प्लांट ची २४ तासात विज व पाणी तोडण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर येथील खंडपीठाने तात्पुरती स्थगीती दिली आहे.

या स्थगिती मूळे डी.एम.सी. दूध संकलन आणि शीतकरण केंद्राला तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे या प्लांट बद्द्ल तक्रार दाखल करणारे तक्रारदार आप्पासाहेब ढूस हे मे.उच्च न्यायालयाच्या या स्थगिती आदेशाचा अभ्यास करून लवकरच पुढील निर्णय घेणार असल्याचे समजते.
कायदे तज्ञांच्या मते डी.एम.सी. दूध संकलन आणि शीतकरण केंद्राला हा तात्पुरता दिलासा मिळविण्यासाठी उच्च न्यायालयातील सुट्टीकालीन मे कोर्टापुढे दोन लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीच्या तारखेला डी.एम.सी. दूध संकलन आणि शीतकरण केंद्र मे न्यायालयात आपली बाजू सक्षमपणे मांडून ते दोन लाख रुपये अनामत पून्हा मिळू शकतील.. की, ती रक्कम जप्त करून मे न्यायालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे २४ तासांत विज तोडण्याचे आदेशाला कायम ठेवतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा