संदीपकुमार जाधव यांची भारतीय पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड

बारामती : मलठण, ता.फलटण येथील श्री.संदीपकुमार जाधव पत्रकारितेसह शिक्षण,सामाजिक,कला,सांस्कृतिक,व राजकीय अशा विविध क्षेत्रातत कार्यरत असणारे कार्यक्षम नाव श्री.संदीपकुमार कैलास जाधव यांची नुकतीच भारतीय पत्रकार संघाच्या “सातारा जिल्हाध्यक्षपदी” निवड करण्यात आली. पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, एम. एस. शेख व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष एस.बी.नदाफ यांनी त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच श्री.जाधव यांना दिले.
श्री.संदीपकुमार जाधव यांची नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे.या निवडीबद्दल पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन, राष्ट्रीय उपाध्यक्ष रविंद्र नेरकर, महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्ष, पल्लवी प्रकाशकर, एम.एस. शेख, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष,एस. बी. नदाफ, तसेच संघाचा लिगल विंगचे प्रदेशाध्यक्ष श्री.कैलास पठारे, तसेच प्रदेश संघटक,श्री.अनिल सोनवणे, पुणे विभागीय अध्यक्ष,श्री.रमेश पाटील यांच्यासह विविध स्तरातून अभिनंदन करण्यात आले.
एक सर्वगुणसंपन्न आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व जे युवकांचे व विद्यार्थ्यांचे येणाऱ्या काळातील हक्काचे नेतृत्व समजले जाते,येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या एकूण राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विधी, कला व सांस्कृतिक पटावरील सर्वसमावेशक, सर्वव्यापक, उदयन्मुख नेतृत्व म्हणजे संदीपकुमार कैलास जाधव.
सर्वसामान्य अशा सैनिक परीवारात जन्मलेले एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे संदीपकुमार जाधव. वडील भारतीय सैन्य दलात असल्यामुळे संदीप जाधव यांचे प्राथमिक शिक्षण सैनिक शाळेमध्ये झाले आणि शिस्तीचे धडे त्यांना आपल्या कुटुंबातून आणि शाळेतून अगदी बालवयात मिळाले.सैनिक शाळेतील शिक्षणामुळे शिस्त, कलात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोन ,नाविन्यता दृढ अपार संघटन कौशल्य, सक्षम तसेच कणखर नेतृत्व सहकार्याची भावना स्पष्ट वक्तेपणा आणि हजर जबाबदारीपणा प्रचंड ध्येयवृत्ती,जिद्द अशा गुणांनी जणू ईश्वराने त्यांना परिपूर्ण केलेले एक हसतमुख दिलखुलास असे व्यक्तिमत्व आहे.
एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्यामुळे अगदी विद्यार्थी दशेपासून त्यांनी विद्यार्थी चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी टोकाचा संघर्ष केला. आणि त्यातूनच पुढे जाऊन एका युवा नेतृत्वाचा जन्म झाला असे हे व्यक्तिमत्व,कलेचे वरदान ईश्वराकडून अगोदरच लाभलेले त्यामुळे एक अप्रतिम व सर्वोत्कृष्ट चित्रकार म्हणून फार कमी वेळात हे व्यक्तित्व कला रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहे. ईश्वराने अगदी तापून सुलाखून पाठवलेले हे व्यक्तित्व इतक्यावरच कसे थांबणार.
विद्यार्थी दशेतील चळवळ त्यांना स्वस्थ बसू देईना म्हणून पुढे जाऊन फक्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे देशातील पहिले एकमेव असे “स्टुडंट मिरर” वृत्तपत्र त्यांनी चालू केले.
वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक चर्चासत्र आयोजित करून युवकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला मात्र हे सर्व होत असताना मनातून एक कलावंत सारखा आवाज देत होता की कलावंतांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या समस्यांसाठी त्यांच्या हक्काचे एक व्यासपीठ असले पाहिजे आणि यातून पुढे जन्म झाला तो “कलारंग कलामोहोत्सव” या संस्थेचा आज या माध्यमातून विविध योजनांवर काम सुरू आहे. त्याच बरोबर युवकांना रोजगार निर्मिती व्हावी याकरिता “कलारत्न उद्योग समूहाची” स्थापना केली व तीचा विस्तार करण्याकरिता सतत पर्यंतशील आहेत.
त्यांचे शिक्षण इयत्ता पहिली ते तिसरी सैनिक शाळा
चौथी ते दहावीपर्यंत श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल फलटण येथे झाले. पुढे
अकरावी ते बारावी मुधोजी महाविद्यालय फलटण येथे झाले, त्यांनी चित्रकला या विषयासाठी ATD भारतीय कला महाविद्यालय जंक्शन ता. इंदापूर येथे पुर्ण केले.
ENTER PRINTING हे भारतीय विद्यापीठ पुणे येथील भारती कला महाविद्यालय कात्रज पुणे.येथे केले
EGD ART – ART MASTER कलासागर कला महाविद्यालय पुणे.येथे पुर्ण केले.
त्यांचे संस्थात्मक कार्य पुढिल प्रमाणे आहे
संस्थापक : कलारत्न बिझनेस ग्रुप २०११ .
संस्थापक : कलारत्न सर्वसाधारण सह. संस्था मर्या. फलटण ता. फलटण जि. सातारा २०१८ ते आजअखेर.
संस्थापक : कलारत्न आर्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर २०१३ ते आजअखेर.
संस्थापक : कलारत्न स्टुडीओ २०१२ ते आजअखेर.
संस्थापक : कलारंग कला मोह्त्सव २०१८ ते आजअखेर.
संस्थापक : कलारत्न सहकारी मुद्रणालय २०१९ ते आजअखेर.
संस्थापक : विधीशास्त्र लॉ बुक्स अँड स्टेशनरी २०२३
संस्थापक / संपादक : स्टुडन्टस़ मिरर २०१२
संस्थापक / अध्यक्ष : विद्यार्थी, कलामंच सन २००७ ते २०१२.
संस्थापक / अध्यक्ष : विद्यार्थी पॅथर २०११ ते २०१५.
संयोजक : संस्कार भारती, फलटण शाखा. २०१4 ते २०१६.
संघटनात्मक कार्य
त्यांनी पत्रकार संघाचे मंत्रालयीन जनसंपर्क अधिकारी तथा प्रवक्ता म्हणूनही कामकाज पाहिले आहे.
प्रदेशाध्यक्ष : ग्राहक हित समिती , महाराष्ट्र २०२२ ते आजअखेर.
अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य कला शिक्षणोतरी व बेरोजगार महाराष्ट्र महासंघ २०१२ ते आजअखेर.
अध्यक्ष : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा फलटण शहर २०१६ ते २०२३.
ब्युरो चीफ: एस.न्युज मराठी वृत्तवाहिनी. २०१९ ते आजअखेर.
कार्यकारी संपादक : दैनिक वसंतसागर २०२२ ते आजअखेर.
कार्यकारी संपादक: महाराष्ट्र पोलीस कारनामा MPK NEWS