क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र
बदलापूर च्या दुर्घटनेची पुनरावृत्ति होऊ नये यासाठी मार्गदर्शन शिबिर व प्रशिक्षण.
पुरंदर मधील श्री कानिफनाथ विद्यालय भिवरी, येथे विद्यार्थिनी व महिलांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर व प्रशिक्षण.

0
1
4
5
6
9
सासवड,पुरंदर: मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अंतर्गत वीर माता धाराऊ महिला प्रतिष्ठान तर्फे “आम्ही महाराजांच्या लेकी” हा उपक्रम खास विद्यार्थीनीच्या स्व-संरक्षणासाठी मोफत प्रशिक्षण व महिलांसाठी मार्गदर्शन असा एकत्रित आयोजित करण्यात आला होता.
श्री.कानिफनाथ विद्यालय भिवरी या शाळेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरंदर तालुक्याचे पालकत्व असणाऱ्या प्रांताधिकारी वर्षाताई लांडगे व पुरंदर भोर चे विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्यासह शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख ॲड.गीतांजलीताई ढोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्याथ्यांसाठी स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण तसेच Good tuch Bad tuch या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले,
या वेळी लांडगे यांनी स्त्री सुरक्षा आणि स्वसंरक्षण या वर विद्यार्थिनी तसेच महिलांना मार्गदर्शन केले,
विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांनी पुरंदर मध्ये विद्यार्थ्यांसाठी कायदा व सुव्यवस्था कशी तत्पर आहे,आणि मुलांसाठी त्यांचे व्हिजन (दूरदृष्टी) काय यावर त्यांनी माहिती दिली.