अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्र
२२ वर्षांनी भेटले शालेय सवंगडी.

0
1
4
5
6
9
अ.नगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी: तालुक्यातील संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,टाकळीमिया, भाग शाळा लाख या विद्यालयातील सन २००२/ ०३ या कालावधीमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दि.७/११/२४ रोजी हाँटेल राजश्री येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम सरस्वती पुजन व द्विपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख व प्रांपचिक माहीती सांगितली.त्यावेळची शिक्षण पद्धती व आत्ताची पद्धती याचाही उल्लेख करण्यात आला. तसेच शिक्षकांबद्दल असलेला आदर,प्रेम,जिव्हाळा व आपुलकी याबद्दलचे मत व्यक्त केले गेले.शिक्षकांनी दिलेली शिक्षा जीवनात कशी उपयोगी आली व त्याचा काय फायदा झाला हेही सांगण्यात आले.
या स्नेहमेळाव्याचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री.बाळकृष्ण खाडे सर हे होते.उपस्थित गुरूजनांमध्ये श्री.अरूण खांदे,श्री.संदिप गोसावी व श्री.गोरक्षनाथ धामोरे सर हे होते.
शिक्षकांचा शाल,श्रीफळ व एक गुलाबाचे रोपटे व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक शिक्षकांनी आपली मनोगते मांडली व पुढील आयुष्यासाठी आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय भाषणाने शेवट करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्तावीक कलवार याने तर आभार तारा देवराये हिने मानले. व कार्यक्रमाचा शेवट सुरूची भोजनाने झाला.
विद्यार्थी मित्र मैत्रिणींना बऱ्याच वर्षांनी भेटून समाधान वाटले, स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, अशी भावना काही मित्र मैत्रिणींनी बोलताना केली.