मुंबई: मागील अडीच वर्षात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे ‘राज्य प्रमुख’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात जागोजागी आरोग्य शिबिरे आयोजित करून महाराष्ट्र पिंजून काढला. वेळकाळ, घर,कौटुंबिक जबाबदाऱ्या, याचा कोणताही विचार न करता समाजाचे जनतेचे आपण काहीतरी देणेकरी आहोत या निस्वार्थ भावनेने कार्य करत राहणे हीच इच्छा मनी बाळगून ते कार्य करीत आहेत, यातूनच त्यांची आज ‘रुग्णदुत’ म्हणून ओळख आहे.

त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांतून राज्यातील लाखो गोरगरीब,निर्धन,निराधार गरजू रुग्णांना मोफत ऑपरेशन व औषधोपचार होऊन ते निरोगी जीवन जगत आहेत.इतकेच नव्हे तर,ठाण्याच्या सुप्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून असंख्य गरीब जनतेच्या लहान मुला-मुलींच्या हृदयावरील छिद्राचे मोफत ऑपरेशन सुखरूपपणे पार पडलेत. व त्या रुग्णांना एक नवजीवन मिळाले आहे,मदत कक्षाचे राज्य प्रमुख म्हणून त्यांची भव्य कारकीर्द राज्यातील सर्वधर्मीय रुग्णांच्या कायम स्मरणात राहील अशीच आहे.
राम राऊत यांच्या या रुग्णसेवेला मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांचे आशिर्वाद,तर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची प्रेरणा अन् मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख “महाराष्ट्राचे आरोग्य दुत” श्री.मंगेशजी चिवटे यांचे मार्गदर्शन लाभणे,ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.
भविष्यातही राम राऊत यांच्या हातून अशीच आणखी जोमाने रुग्णसेवा व्हावी, अशी तमाम महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे.आणि याच सोबत आता राष्ट्रीय चर्मकार महासंघाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.अर्थातच त्यांची जबाबदारी दूपट्टीने वाढली आहे.एकीकडे राज्यातील सर्वधर्मीयांची रुग्णसेवा तर, दुसरीकडे आपल्या चर्मकार समाजाच्या बंधू-भगिनी आणि सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींच्या रोजगार, स्वयं रोजगाराचे प्रश्न सोडवून त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्याची भूमिका, रामहरी राऊत ‘महाराष्ट्राचे संघटक’ या नात्याने बजावावी लागणार आहे.
या सामाजिक कार्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तमाम रुग्णसेवक,डॉक्टर्स,वैद्यकीय सहाय्यक अन् अन्य कर्मचाऱ्यांतर्फे राम राऊत यांना खूप शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.व ते या कामी निश्चित यशस्वी होतील, असा राज्यातील असंख्य गोरगरीब जनतेचा विश्वास आहे.
“रामहरी” या नावातच फार मोठी दैवी शक्ती असल्याने ते निश्चितच या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पडतील.असा समस्त महाराष्ट्रवासियांना यांना विश्वास आहे.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा