अ नगर जिल्हा प्रतिनिधी

राहूरी : तालूक्याची कामधेनू म्हणून ओळख असणाऱ्या डॉ बाबूराव बापूजी तनपूरे सहकारी साखर कारखान्याच्या कायम व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत वेतन,सेवानिवृत्त पेन्शन रक्कम, शिल्लक भविष्य निर्वाह निधी रक्कम,ग्रॅज्यूएटी रक्कम, भविष्य निर्वाह निधी विभागाकडे शिल्लक असणारी कामगारांची दहा टक्के असणारी गंगाजळी रक्कम त्वरित अदा करण्यात यावी याच्यासाठी कार्यस्थळावरील लक्ष्मी नारायण मंदीर प्रांगणात निवडक कर्मचाऱ्यांचे वतीने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आमच्या कारखान्याच्या युनियनच्या वतीने कोणत्याही प्रकारचे पाठबळ आमच्या व्यथित कामगारांना मिळत नाही,मुळात ही युनियनच बरखास्त करुन जे कामगारांना न्याय देऊ शकतात अथवा देण्यासाठी धडपड करतात त्यांचेकडेच युनियनचा कारभार देण्यात यावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे.आज पर्यंत आमच्या संसाराची राखरांगोळी होत असताना ही युनियन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.ज्या दिवंगत कामगारांच्या पैशावर जे कामगार भवन उभारले त्या कामगार भवनच्या माध्यमातून येणा-या पैशाचा अपव्यय सूरू आहे.कामगार मेटाकूटीला आला तरीही युनियन हाताची घडी व तोंडावर बोट घेउन कुंभकर्णाची झोप घेत आहे असे चंद्रकांत कराळे, नानासाहेब पेरणे,रफीक सय्यद,तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आपली कैफीयत नियोजन बैठकीत उपस्थितांसमोर आपल्या मनोगतात मांडली,

यावेळी सोपान कोहकडे, भास्कर कोळसे,संतोष दूशिंग,पावलस भोसले,आबा शेलार, आदि कामगार उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा