बारामती : स्वातंत्र्य विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगांव निंबाळकर प्रशालेत शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक वंदनीय जयवंतराव तथा दादासाहेब जगताप यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

शैक्षणिक व सामाजिक कार्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. दादासाहेबांनी बहुजन समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळावे यासाठी जनता शिक्षण संस्थेची स्थापना करून अनेक शाखा उभारल्या.
गोर-गरीबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळवून दिले. दादासाहेबांच्या या कार्याला त्यांच्या पत्नी जयंती (माईंनी) जगताप यांनी साथ दिली. आजपर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या अनेक शाखांमधून शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, पत्रकार, पोलीस, सैन्यदलात व सामाजिक राजकीय कार्यात कार्यरत आहेत.

दादासाहेब,माई यांच्या कार्याविषयी ज्येष्ठ शिक्षक श्री. अनिल पाटील सर, जनता शिक्षण संस्थेचे संचालक व प्राचार्य हेमंत तांबे सर यांनी विद्यार्थ्यांना सखोल माहिती सांगितली.

याप्रसंगी पर्यवेक्षक श्री हेमंत बगनर सर व सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री काळे सर व श्री नाळे सरांनी सर्वांचे आभार मानले.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा