ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
भटाई देवी माध्यमिक विद्यालय खंडलाय येघे शिवजयंती उत्साहात साजरी

0
1
4
5
6
9
धुळे जिल्हा प्रतिनिधी, संकेत बागरेचा,नेर
धुळे : धनदाई माता शिक्षण प्रसारक मंडळ खंडलाय संचलित भटाई देवी माध्यमिक विद्यालय खंडलायाचे अध्यक्ष श्री.आण्णासो.लक्ष्मण सुकदेव माळी, उपाध्यक्ष, सचिव व पदाधिकारी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यालयाच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवजयंतीचे जनक महात्मा जोतिबा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन संस्थेचे संचालक श्री. सुदाम माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री.सिसोदे सर,श्री.मनोज बोरसे सर व इतर सहकारी यांच्या मदतीने विद्यार्थ्यांकडून लेझीम नृत्य सादर करण्यात आले.
पालखीत श्री.शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून ढोल, ताशांच्या गजरात, लेझीम नृत्यासह गावांत मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी गावातील चौका चौकात पालखीचे व महाराजांचे औक्षण करण्यात आले. कार्यक्रम योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.