Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

बारामतीकरांनो, वाहतुकीचे नियम माझ्यासहित कुणी मोडू नका- अजित पवार

वाहतुक जनजागृती मोहिम पत्रकाचे प्रकाशन; पवारांकडून वाहतूक नियमांचे धडे

0 1 4 5 6 9

बारामती दि. ३ ‘वाढती लोकसंख्या पाहता व वाहतुकीची होत असलेली कोंडी पाहता बारामती वाहतुक शाखेने अनेक उपक्रम राबवले आहेत.या नियमांची आवश्यकता पाहता वाहतुक शाखेने नागरिकांमध्ये नियमांची जनजागृती व्हावी यासाठी माहिती पुस्तक तयार केले आहे. प्रत्येक शाळेत जाऊन युवा-युवतींना हे पुस्तक देणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड वाढवण्यात आला आहे. बारामतीकरांनो, कृपा करून वाहतुकीचे नियम माझ्यासहित कुणीही मोडू नका, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने बारामती येथे पुणे ग्रामीण पोलीस दलातील प्राप्त नवीन वाहनांचे अनावरण तसेच बारामती उपविभागातील उघडकीस आलेल्या मालमत्तेच्या गुन्ह्यातील मालाचे मूळ मालकास वितरण हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

गेली अनेक महिन्यांपासून बारामती वाहतुक शाखेने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून बारामतीच्या वाहतूक कोंडीचा श्वास मोकळा केला आहे. वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण,पार्किंग साठी नायलॉन दोरीचे प्रयोग, विना वाहन चालक परवाना, फॅन्सी नंबर, कार स्टंट आदींवर वेळोवेळी कारवाया करून आजपर्यंत लाखोंचा दंड वसुल केला आहे. एवढेच नव्हे तर बारामती शहरातील टवाळ व टुकार दुचाकी चालकांवरही वेळोवेळी कारवाया करून महिला-मुलींचा रस्ता सुरक्षित केला आहे. नागरिकांना वाहतुकीचे नियम कळावेत यासाठी वाहतुक शाखेने सतत जनजागृती मोहीम सुरू केली आहे. वाहतुक नियमांचे माहिती पत्रक काढले आहे. या जनजागृती मोहिमेच्या पत्रकाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाया करण्यात येत आहेत. त्यातच अशा बेशिस्त चालकांवर दंड आकारण्यात येत असून ही दंडाची रक्कमही वाढवण्यात आली असल्याचे पवार यांनी बोलताना सांगितले.

यावेळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, प्रांताधीकारी वैभव नावडकर, पदाधिकारी सचिन सातव नाना होळकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, मोहन भटे, बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण, विलास नाळे, वैशाली पाटील, पोलीस अमलदार, इतर मान्यवर व पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे