अपघातआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक जयवंतराव तथा दादासाहेब जगताप यांची जयंती उत्साहात साजरी

0
1
4
5
6
9
बारामती : १५जानेवारी २०२५ रोजी जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक वंदनीय कै. दादासाहेब जगताप यांची जयंती स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर प्रशालेमध्ये साजरी करण्यात आली, खरं तर हा “स्नेहदिन” म्हणून साजरा करण्यात आला.
संस्थापकांच्या जयंतीनिमित वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री सुनील ढोले ,जनता शिक्षण संस्थेचे तहयात सदस्य डॉ. विजयकुमार होळकर, माजी उपसरपंच श्री. संजय साळवे, सदस्य श्री.अजित भोसले ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.कपिल शेंडे, उपाध्यक्ष श्री.संतोष गायकवाड, सदस्य जितेंद्र पवार, तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष व पत्रकार श्री.सुशीलकुमार अडागळे ,पत्रकार श्री.सुनील जाधव, प्रशालेचे प्राचार्य आणि जनता शिक्षण संस्थेचे ग्रामीण संचालक श्री.हेमंत तांबे सर, पर्यवेक्षक व जनता शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव श्री.बगनर सर, कर्मवीर भाऊसाहेब हिरे सेवक सहकारी पतसंस्थेचे उपसभापती श्री. मंगेश माने सर, पतसंस्थेचे संचालक श्री संजय साळुंके सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या समवेत हा कार्यक्रम पार पडला.
उपस्थितांचे स्वागत व परिचय श्री मोहन गायकवाड सर यांनी केले.या स्नेह दिनाचे औचित्य साधून गावामध्ये सर्व विद्यार्थ्यांसमवेत प्रभात फेरी काढण्यात आली.
श्री.अनिल पाटील सरांनी आपल्या मनोगतातून वंदनीय कै. दादासाहेब जगताप यांचे सामाजिक व शैक्षणिक माहिती व्यक्त केली. जनता शिक्षण संस्थेची स्थापना व दादासाहेबांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची महती सांगीतली.
सन्माननीय सरपंच श्री सुनील ढोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.त्यानंतर प्राचार्य श्री तांबे सरांनी दादासाहेबांनी केलेल्या कार्याचा आणि शाळेसाठी दिलेल्या योगदानाचा इतिहास सांगितला.