मुंबई : आम्ही या भारताचे नागरिक आहोत, आम्हीही समाजाचा एक भाग आहोत,आणि आम्हालाही मूळ प्रवाहात राहण्याचा अधिकार आहे,या हक्काने व अधिकाराने भटके विमुक्त समाजाच्या सामाजिक संघटना, पदाधिकारी व यांनी आपल्या हक्कासाठी महाराष्ट्रातील सर्व भटके विमुक्त (VJNT) समाजात सक्रिय असणाऱ्या सर्व जाती-जमातींच्या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र व इतर सहयोगी सर्वसामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक २४/०९/२०२४ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आझाद मैदान येथे उपोषण सुरू आहे.

भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली पण आजही भटके विमुक्त समाजाचे अन्न, वस्त्र, निवारा, असे साधे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत,भटके विमुक्त समाजातील लाखो लोकांना आजही राहण्यासाठी हक्काचे घर नाही,शेतजमीन नाही, रेशन कार्ड नाही, जात प्रमाणपत्र नाही, मतदान ओळखपत्र नाही, म्हणजे भटके विमुक्तांना एक प्रकारे भारत देशाचे नागरिकत्व नाकारण्यात आले आहे,
स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक लढवय्या धर्म व संस्कृती यांचा वाहक व संरक्षक असणारा, कलाकुसर व मनोरंजन करणारा, पशुपालन व दुग्ध व्यवसाय करणारा, तसेच शेती उपयुक्त अवजारे व हत्यारे बनवणारा समाज आज या शासनकर्त्यांच्या व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे देशोधडीला लागला आहे. त्यामुळे गावोगावी पोटाची खळगी भरण्यासाठी वनवन भटकत आहे.

सुस्तावून पडलेल्या शासन कर्त्यांना व प्रशासनास जाग आणण्यासाठी व मागील ७५ वर्षापासून भटके विमुक्तांचे प्रलंबित असणारे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष मा. प्रा.श्री धनंजय शिवाजी ओंबासे यांचे नेतृत्वात आझाद मैदान येथे उपोषण सुरू आहे.

उपोषणकर्त्यांनीं प्रमुख मागण्या केल्या आहेत
अ) मा.ना.मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०२/०८/२०१९ रोजी झालेल्या बैठकीतील मागण्या
१) केंद्रातील सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील समस्त भटके विमुक्तांचे सर्वेक्षण करणे.
२) यशवंतराव चव्हाण पाल मुक्त वसाहत योजना ग्रामीण व शहरी भागास लागू करणे.
३) जातीच्या प्रमाणपत्र संबंधित २००८ च्या जीआर मध्ये बदल करून पुनर्जीवित करणे.
४) महा ज्योती अंतर्गत परदेशी स्कॉलरशिप मध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाचा समावेश करणे.
५) लोक कलावंतांच्या मानधनात वाढ करणे व लोककलावंत महामंडळाची स्थापना करणे.
६) वसंतराव नाईक महामंडळ ५०० कोटी अनुदान देणे.
७) सर्कस मैदान अंबरनाथ येथील भटकविमुक्तांच्या वसाहतीचे पुनर्वसन करणे.
८) धनगर समाजास लागू केलेल्या शैक्षणिक व वस्तीगृह योजनेत भटके विमुक्तांचा समावेश करणे.
ब) अन्य मागण्या-
१) भटके विमुक्त प्रवर्ग व जाती जमातीला सामाजिक प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्यपाल नियुक्त एक प्रतिनिधी विधानपरिषदेवर नियुक्त करणे.
२) पार्टीच्या धरतीवर वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनर्ती )स्थापन करणे.
३) भटके विमुक्त समाजास लागू करण्यात आलेली नॉन क्रिमीलेअरची अट रद्द करणे.
४) भटके विमुक्त जाती जमातीवर होणाऱ्या अन्यायाला प्रतिबंध घालण्यासाठी भटके विमुक्तांच्या ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये समावेश करणे.
५) बार्टी प्रमाणे महाज्योती संस्थेतर्फे ओबीसी व VJNT च्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी फेलोशिप १००% दराने नोंदणी दिनांका पासून अदा करण्यात यावी.
६) उच्च माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी प्रवेश यावेळी जात वैद्यता कास्ट व्हॅलेडीटी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत प्रवेश दिनांक पासून सहा महिन्यापर्यंत वाढवावी तसेच या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती त्याच शैक्षणिक वर्षात अदा करण्यात यावी,
७) इंग्रज राजवटीत गुन्हेगारी जमातीसाठी तयार केलेले सेटलमेंट कॅम्प च्या जमिनीवर सदर समाजाच्या वसाहती निर्माण करण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा.
अशा वरील विविध मागण्यांसाठी भटके विमुक्त जमातीतील सर्व जाती जमातीच्या सक्रिय सामाजिक संघटना, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने शासनाला नम्र विनंती व आव्हान केले आहे.

या उपोषणासाठी भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
मा.श्री धनंजय ओंबासे यांच्या नेतृत्वाखाली
मा. श्री.सखाराम धुमाळ
मा.श्री प्रतीक सुहास गोसावी
मा.श्री माणिकराव जोशी
मा.श्री नागेश जाधव
मा.श्री भीमराव इंगोले
मा.श्री मंगेश सिंह सोळंकी
मा.श्री साहेबराव गोसावी
भंडारी मा.श्री दिलीप परदेशी तसेच अशोक
गिरी महाराज व कृष्णा जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित आहेत.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा