
इंदापूर : तालुक्यातील बोरी येथे घडलेली घटना याबाबत फिर्याद पिडीतेचा मामा यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली होती. फिर्यादीप्रमाणे दिनांक २६/१०/२०१४ रोजी फिर्यादी हा कामावरून घरी आला असता पिडीता घरी नसलेचे लक्षात आले. त्याबाबत फिर्यादीने पिडीतेच्या बहिणीस याबाबत विचारणा केली असता पिडीता व तिची बहिण नवीन कपडे बदलून आणणेसाठी बोरी येथे गेलेचे सांगितले. दुकान बंद असलेने त्या दुपारी १२.०० वाजता पायी चालत घरी येत असताना आरोपी त्याच्या काळया रंगाच्या मोटार सायकल वरती आला व गाडीवर बसा असे म्हणून त्या दोघींना रूई येथे बाबीर बुवा यात्रेसाठी घेवून गेला. दोघींना यात्रेत फिरवले व पुन्हा बोरी येथे येवून मोटार इंग्लिश मिडीयम स्कूल येथे थांबिवली व पिडीतेच्या बहिणीस उतरवून पिडीतेला जबरदस्तीने मोटार सायकलवरून नेवून तिचे अपहरण केले. त्यामुळे पिडीतेच्या बहिणीच्या कथनावरून फिर्यादीने याबाबत वालचंदनगर पोलीस स्टेशनला तकार दिलेली होती. त्या अनुषंगाने आरोपीविरूध्द सुरूवातीला भा.द.वि.क. ३६३, ३६६, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर प्रकरणाचा तपास वालचंदनगर पोलीस स्टेशनचे तात्कालीन पी.एस.आय. एस. वाय. क्षिरसागर यांनी केला. तपासामध्ये आरोपी प्रशांत शेंडगे याने पिडीतेचे अपहरण करून तिच्यावर वाठार रेल्वे स्टेशन, बिचकुलगांव जिल्हा सातारा व काझड ता. इंदापूर येथे लैंगिक अत्याचार केलेचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने आरोपी विरूध्द सत्र न्यायालयामध्ये बाल लैगिंक अत्याचार कलम ४, ६, ८ व भा. द.वि.क. ३६३, ३६६, ३७६ (अ) प्रमाणे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले होते. सदरचा खटला सुरूवातीला बारामती येथील सत्र न्यायालयामध्ये सुरू होता. परंतू इंदापूर येथे सत्र न्यायालय सुरू झाल्यावर सदरचा खटला इंदापूर येथे वर्ग झालेला होता. त्यामध्ये सुनावणी होवून सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आलेले होते. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील श्री. प्रसन्न जोशी

यांनी काम पाहिले. पिडीतेची साक्ष या प्रकरणामध्ये महत्वाची ठरली नमेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष आरोपीच्या दोषसिध्दीसाठी महत्वाची उरली वैद्यकीय अहवालाप्रमाणे पिडीतेवर अत्याचार झालेचे निष्णन्न झाले होते. तसेच तपासी अधिकारी यांचा पुरावा व न्यायवैद्यकीय अहवाल हा महत्वाचा ठरला. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील श्री. प्रसन्न जोशी यांनी केलेला युक्तिवाद व आलेला पुरावा ग्राहय धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. यू.एम. मुधोळकर साहेब यांनी आरोपीस बाल लैंगिक अत्याचार कलम ४. ६.८ व ३६६, ३७६ (अ) प्रमाणे २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व पन्नास हजार रूपये दंड व दंड न भरलेस १ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा, तसेच भा.द.वि.क. ३६३ प्रमाणे ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व पंचवीस हजार रूपये दंड, दंड न भरलेस तीन महिने सक्त मजुरी भा.द.वि.क. ३६६ प्रमाणे ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व पंचवीस हजार रूपये दंड, दंड न भरलेस तीन महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली. त्याचप्रमाणे दंडाची रक्कम पिडीतेला तिच्या वैद्यकीय उपचारासाठी व तिच्या पुर्नवसनासाठी देण्याचा आदेश मे. कोर्टाने केलेला आहे तसेच दंड न भरलेस शासनाने पिडीतेला नुकसान भरपाईचे आदेश में, न्यायालयाने दिले आहेत. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षास कोर्ट पैरवी अधिकारी सहा. फौजदार श्री. ए.जे. कवडे, तसेच कोर्ट अंमलदार महिला पोलीस हवालदार प्रेमा देविदास सोनवणे यांची मदत झाली.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा