ब्रेकिंगमहाराष्ट्र
कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील नागरिकांसोबत संयुक्त शांतता बैठक संपन्न.

0
1
4
5
6
9
बारामती : आगामी दिनांक ०१/०१/२०२५ रोजीचे कोरेगाव भीमा शौर्य दिनाचे कार्यक्रम पार्श्वभूमीवर माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील सर्व गावचे भीम अनुयायी, सर्व धर्मीय प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील यांची संयुक्त शांतता बैठक काल दिनांक २७/१२/२०२४ रोजी माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक श्री सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
साहेब पोलीस निरीक्षक श्री.सचिन लोखंडे यांनी या बैठकीस उपस्थित भीम अनुयायी यांचेसोबत या दिवशी शौर्य दिन अनुषंगाने आयोजित इतर कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, अगर कसे याबाबत माहिती घेवून उपस्थित मान्यवर कोणीही सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, अशा पोस्ट समाज माध्यमात प्रसारित करू नयेत तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशा सुचना देऊन योग्य ते मार्गदर्शन केले.
या बैठकीस श्री.विश्वास भोसले, युवक तालुकाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), श्री रोहन गायकवाड पदाधिकारी, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्री. बाबा घोडके, युवाशक्ती दहीहंडी ग्रुप, श्री.संग्राम भोसले, यांचेसह पत्रकार श्री.योगेश भोसले, तालुकाध्यक्ष,बारामती मराठी पत्रकार संघ, पत्रकार श्री विजय भोसले, दैनिक पुढारी श्री.रोहित जगताप, तालुकाध्यक्ष, बारामती पोलीस पाटील संघटना,
श्री.सुरेश काटे, पोलीस पाटील मौजे पाहुणेवाडी, श्री.अमित देवकाते पोलीस पाटील मौजे निरावागज, श्री.योगेश खोमणे,पोलीस पाटील, मौजे माळेगाव खुर्द, श्री.राजेंद्र राजगुरू, पोलीस पाटील मौजे सोनकसवाडी, सौ.सुप्रिया गावडे पोलीस पाटील मौजे कऱ्हावागज, श्री.नितीन घनवट, पोलीस पाटील मौजे शिरवली, श्री.अविनाश जगताप पोलीस पाटील मौजे मानाप्पावस्ती, श्री.ईश्वर खोमणे पोलीस पाटील मौजे अंजनगाव, श्री.हनुमंत नाळे, पोलीस पाटील मौजे नेपतवळण, श्री.सतीश शेंडगे, पोलीस पाटील मौजे येळेवस्ती यांचे सह विविध गावातील नागरिक उपस्थित होते.
दिनांक ०१/०१/२०२५ रोजीचे कोरेगाव भीमा शौर्य दिनाचे पार्श्वभूमीवर माळेगाव पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा काल दिनांक २७/१२/२०२४ रोजी जातीय दंगा काबू योजना (मॉब ड्रिल) सराव घेण्यात आला.
त्यानंतर मौजे माळेगाव बुद्रुक नगरपंचायत हद्दीत गोफणेवस्ती फाटा – अमरसिंह नगर – राजहंस चौक – नगरपंचायत वेस – पालखी या मार्ग पथसंचलन करण्यात आले.
संग्रहित छायाचित्र