बारामती: महाविकास आघाडी सरकारच्या काळात अगदी मृत अवस्थेत पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला जीवनदान देण्याचे कार्य कोणी असेल तर ते श्री मंगेश चिवटे यांनी केले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात पहिल्या दिवसापासून जनमानसात प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे वैद्यकीय मदत कक्षाचे कार्य पोहचविण्याचे काम जर कोणी असेल तर ते श्री मंगेश चिवटे यांनी केले आहे.श्री.एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळात अवघ्या २.५ वर्षांच्या सरकारमध्ये ३६० कोटी पेक्षा जास्त वैद्यकीय निधी गोरगरीब गरजू रुग्णांना मिळवून देवून जगभरात एक आदर्श उभा करणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री.मंगेश चिवटे.

आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची ओळख किंवा वैद्यकीय मदत कक्ष जर माहीत असेल तर तो फक्त श्री मंगेश चिवटे यांच्यामुळेच पूर्ण महाराष्ट्राला माहीत झाला आहे.

कोणतीही जात-धर्म-पंथ न पाहता किंवा कोणताही पक्ष न पाहता या व्यक्तीने हजारो शेकडो रुग्णांना वैद्यकीय निधी मिळवून देण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता, स्वतः ची तब्येत ठीक नसताना उपचार सुरू असताना स्वतःच्या आरोग्याचा स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता मग ते चालू वाहनात सलाईन लावणे सलाईन संपले की मंत्रालयात येवून आपल्या जबाबदारीचे आपल्या कर्तव्याचे पालन करीत असत मग रात्री कितीही वाजले तरी त्याचा विचार न करता आपली जबाबदारी आणि आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर राहुन आपले कार्य पूर्ण करत असत. तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या कामकाजात कितीही व्यस्त असले तरीही कोणाच्यातरी जीवाचा प्रश्न असेल तर स्वतः तात्कालीन मुख्यमंत्री यांची भेट घेऊन, पत्र घेऊन,शिफारस घेऊन त्या व्यक्तीच्या जीवासाठी प्रयत्न करणारे एकच नाव मंगेश चिवटे.

राज्यातील ५१ हजार रुग्णांना किंबहुना त्यापेक्षा जास्त लोकांना मदत मिळवून देणारा व्यक्तीच या पदासाठी लायक आहे अशी महाराष्ट्रातल्या जनतेची भूमिका आहेमत आहे. जर मंगेश चिवटे यांच्यासारखा व्यक्ती या जबाबदारी साठी कायम राहिला तर राज्यातील सामान्य जनतेला किंवा रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी हि गोष्ट वरदान समजली जाईल.अशी संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या ज्या रुग्णांना वैद्यकीय मदत मिळाली आहे अशा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून अपेक्षा केली जात आहे.
व साठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी श्री चिवटे यांच्याकडेच रहावी अशी तीव्र मागणी होत आहे.
नुकतीच वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाची राज्य कार्यकारणी जाहीर झाली आहे व त्यांच्या वतीने एक शिष्टमंडळ विद्यमान मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या संदर्भात लवकरच निवेदन देणार आहेत.
मागील अडीच वर्षात गोरगरीब गरजू रुग्णांसाठी दैदीप्यमान असे भरीव काम करणाऱ्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू राहावा अशी संपूर्ण महाराष्ट्राची व महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे त्यावर विद्यमान मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व त्यांच्या सरकारमधील मंत्री योग्य तो विचार करतील व या जबाबदारीसाठी श्री मंगेश चिवटे हेच व्यक्ती योग्य आहेत असे मानून ती जबाबदारी त्यांच्याकडे देतील अशी महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा