महाराष्ट्रसामाजिक
वडगाव निंबाळकर येथे सामाजिक एकतेचे दर्शन; मुस्लिम बांधवांकडून संत सोपान काका महाराज पालखीचे उत्स्फूर्त स्वागत

0
7
8
4
3
6
वडगाव निंबाळकर (बारामती): आषाढी वारी ही केवळ पंढरीकडे जाणारी पायी वारी नसून, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीतील समता, सेवा, प्रेम आणि बंधुभावाचा अखंड प्रवाह आहे. याचाच प्रत्यय नुकताच बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर परिसरात पाहायला मिळाला. पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत सोपान काका महाराज पालखी सोहळ्याचे आणि दिंडीचे येथे आगमन होताच, स्थानिक मुस्लिम बांधवांनी अत्यंत उत्साहात आणि सेवाभावाने या पालखीचे स्वागत करून सामाजिक व धार्मिक एकतेचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकाराम, विठ्ठल नामाच्या घोषात दिंडीचे आगमन होताच मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी केली. ऊन आणि प्रवासाचा थकवा दूर करण्यासाठी लांबून चालत आलेल्या वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय आणि अल्पोपहाराचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. हातात पाण्याच्या बाटल्या आणि अल्पोपहार घेऊन उभे असलेले मुस्लिम युवक, येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला माऊली पाणी घ्या, अल्पोपहार घ्या असा आग्रह करत अत्यंत आदराने त्यांची सेवा करत होते.
यावेळी दिंडीचे प्रमुख त्रिभुवन गोसावी महाराज यांचा मुस्लिम बांधवांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.




