Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

वाई पोलिसांची धडाकेबाज कारवाई: डीपीतील तांब्याची तार चोरणारी टोळी जेरबंद; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

0 5 5 5 3 3

वाई : वाई परिसरातील विद्युत रोहित्र (डीपी) फोडून त्यातील मौल्यवान तांब्याची तार चोरणाऱ्या एका सराईत टोळीचा वाई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून १७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे, यातील काही आरोपी सातारा जिल्ह्यातून तडीपार असूनही गुन्हेगारी कृत्य करत होते.

गेल्या काही दिवसांपासून वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोम कॅनॉल परिसर आणि इतर भागात विद्युत रोहित्रांचे नुकसान करून त्यातील तांब्याची तार चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत सातारा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी यांनी तपासाचे आदेश दिले होते. धोम कॅनॉल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते.

वाई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाने तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास चक्र फिरवली. यामध्ये ३ आरोपी फलटणचे तर त्यांना मदत करणारे ३ आरोपी वाई येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून एकूण ६ जणांना बेड्या ठोकल्या.

कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल खालील प्रमाणे 

३०० किलो तांब्याची तार

गुन्ह्यात वापरलेली २ दुचाकी वाहने

१ चारचाकी वाहन

५ मोबाईल फोन

एकूण किंमत: १७,००,०००/- (१७ लाख रुपये)

अटक केलेले आरोपीखालील प्रमाणे आहेत

१. मुकेश माणिक जाधव (४५, रा. मलटण, फलटण)

२. अनिकेत सुभाष बनसोडे (२२, रा. मलटण, फलटण)

३. अर्जुन राजू जाधव (२०, रा. मलटण, फलटण)

४. रोहन लाखन घाडगे (२४, रा. यशवंतनगर, वाई)

५. विजय बाबुराव शिंदे (३६, रा. यशवंतनगर, वाई)

६. मनोज नामदेव घाडगे (४०, रा. यशवंतनगर, वाई)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ ते ३ हे सराईत गुन्हेगार असून आरोपी क्रमांक २ व ३ यांना सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.

या टोळीच्या अटकेमुळे वाई पोलीस ठाण्यातील २०२५ आणि २०२६ सालातील एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. या आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३२४(४) आणि भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र शहाणे, सहा. पोलीस निरीक्षक अमोल गवळी, फौजदार सुधीर वाळुंज आणि त्यांच्या पथकाने केली आहे. पोलीस अधीक्षकांनी या पथकाचे विशेष कौतुक केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे