अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत वडगांव निंबाळकर येथे स्वच्छता हिच सेवा उपक्रम साजरा

0
7
9
2
3
2
बारामती : आपला देश विकासाच्या वाटेवर असून देशाचे नावलौकिक करण्यासाठी कामकाज सुरू आहे. याचाच भाग म्हणून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भाग सक्षम असेल तर जिल्हा सक्षम होईल व जिल्हा सक्षम असेल राज्य सक्षम होईल पर्यायाने देश सक्षम होईल म्हणून या अभियानाच्या माध्यमातून अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे, यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे.

याचाच एक सहभाग म्हणून दिनांक 25/09/2025 रोजी वडगांव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच स्वातंत्र्य विद्या मंदिरचे शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने वडगांव निंबाळकर ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर,श्री महादेव मंदिर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वडगांव निंबाळकर, बाजार तळ व ग्रामपंचायत कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली.

याच अनुषंगाने वडगांव निंबाळकर ग्रामपंचायत येथे दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी एक विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या ज्या काही अडचणी असतील त्या समजून घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले तसेच गावातील पाणंद रस्ते,शिवरस्ते खुले करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती.

स्वच्छता अभियाना दरम्यान मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या हेतूने ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग कसा वाढविता येईल व शासनाच्या विकास योजना प्रभावी व जलदगतीने राबवून त्याची अंमलबजावणी करून त्या योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकांपर्यंत कसा पोहोचविता येईल यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील राहिल,या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान कसे उंचावेल या साठी ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण व्हायला हवी अशी आशा यावेळी सरपंच श्री.सुनील ढोले यांनी व्यक्त केली.




