अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
राजुरी: देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीत भुमिगत गटाराची कामे झाली असून या कामामुळे रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडले असल्याने अनेकवेळा अपघात होत असून खड्डे बजवून दुरुस्ती करण्यासाठी माजी नगरसेवक अदिनाथ कराळे यांनी आज सकाळ पासून उपोषण सुरु केले होते. देवळाली प्रवरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी ऋषीकेश पाटील व ठेकेदार निखिल कातोरे यांनी ३० जुन पर्यंत भुमिगत गटारीवरील सर्व खड्डे बुजविण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर माजी नगरसेवक कराळे मुख्याधिकारी पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेवून उपोषण सोडले.

देवळाली प्रवरा नगर पलिका हद्दीतील देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात भूमिगत गटाराचे काम केले असून त्यासाठी रस्ते खोदले होते. परंतू रस्ते बुजवताना निकृष्ठ पद्धतीने बुजविले गेल्याने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडले आहे.रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवून रस्ते तात्काळ दुरुस्त करा या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी आठ दिवसापुर्वी मुख्याधिकारी पाटील यांना दिले होते.

नगर पालिकेस दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने दखल घेतली नसल्याने माजी नगरसेवक कराळे यांनी आज सकाळ पासून पालिका कार्यालया समोर उपोषण सुरु केले होते.कराळे यांच्या उपोषणाची दखल घेवून नगर पालिकेचे मुख्याधिकारी ऋषीकेश पाटील यांनी संबधित ठेकेदाराला बोलावू घेत,उपोषणकर्ते व ठेकेदार निखिल कातोरे यांच्यात घडवून आणून दि.३० पर्वत जुन भुमिगत गटारीमुळे पडलेले खड्डे बुजवून देवळाली प्रवरा शहर खड्डे मुक्त शहर करण्याचे लेखी आश्वासन दिले.

उपोषण स्थळी शैलेंद्र कदम,अनंत कदम,संदीप मुसमाडे,मच्छिंद्र कराळे, सुधाकर कराळे,प्रशांत कोळगे,तेजस कराळे, वसीम शेख,साजिद शेख,बाळासाहेब कदम, युवराज तनपुरे,प्रथमेश तनपुरे, सुभाष शेकडे,समीर शेख,साजिद शेख,प्रशांत कोळगे,शोएब शेख,गणेश औटी,सचिन रसाळ, बाळासाहेब आढाव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान उपोषण सुरू सुरू झाल्या नंतर काही पत्रकारांनी मुख्याधिकारी पाटील यांची भेट घेतली असता दालना बाहेर थांबायचे सांगितले परंतू मुख्याधिकारी पाटील यांनी पत्रकारांना भेट देण्याचे टाळले.या घटनेचा पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध केला.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा