Breaking
अभिव्यक्तीगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसोशल मिडिया

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने करंजेपुल येथे सायबर गुन्हे जनजागृती अभियान संपन्न

0 8 0 6 9 3

करंजेपुल/बारामती: वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारंजेपुल दूरक्षेत्र येथे आज, शनिवार दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सायबर गुन्हे प्रतिबंध व जनजागृती अभियानांतर्गत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये डिजिटल साक्षरता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

सदर अभियान वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी उपस्थितांना सायबर गुन्हेगारीविषयी सविस्तर व विस्तृत मार्गदर्शन केले.

वाढत्या डिजिटल युगात ऑनलाइन फसवणूक कशा प्रकारे होते, बनावट लिंक किंवा मेसेजला बळी पडून होणारी फसवणूक, ओटीपी शेअर केल्याने होणारे आर्थिक नुकसान, तसेच सोशल मीडियावरील ओळख चोरी यांसारख्या विविध सायबर गुन्ह्यांची कारणे त्यांनी समजावून सांगितली. याशिवाय, ऑनलाइन व्यवहार करताना पासवर्ड सुरक्षित ठेवणे, अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती न देणे, संशयास्पद ॲप्स किंवा एपीके फाईल डाऊनलोड न करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपली डिजिटल सुरक्षितता कशी अबाधित राखावी याविषयी नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगावी याची सखोल माहिती दिली.

या कार्यक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्या नागरिकांची यापूर्वी ऑनलाईन फसवणूक झाली होती, अशा नागरिकांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले अनुभव कथन केले. आपली फसवणूक नेमकी कशी झाली आणि गुन्हेगार कशा प्रकारे फसवणुकीच्या जाळ्यात ओढतात, याची वास्तवदर्शी माहिती त्यांनी दिल्याने उपस्थित नागरिकांना धोक्याची योग्य जाणीव झाली. 

यासोबतच जनजागृतीचा भाग म्हणून कार्यक्रमात सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, डिजिटल सुरक्षितता आणि आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या सुविधेची माहिती देणाऱ्या पोस्टर्सचे सर्वांना वाटप करण्यात आले.

या जनजागृती कार्यक्रमास समाजातील विविध स्तरांतील घटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये पत्रकार, स्थानिक आणि वरिष्ठ नागरिक, महिला दक्षता समितीचे सदस्य, व्यापारी संघटना आणि शांतता समितीचे सदस्य, ज्वेलर्स असोसिएशनचे प्रतिनिधी, बँक अधिकारी व कर्मचारी, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे, गोपनीय विभागाचे हृदयनाथ देवकर, हवालदार पोपट नाळे आणि निलेश जाधव हे पोलीस अधिकारी व कर्मचारी हजर होते. याप्रसंगी बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे कायदेविषयक सल्लागार ॲड. गणेश आळंदीकर, दैनिक सकाळ चे पत्रकार चिंतामणी क्षीरसागर, महाराष्ट्र पोलीस कारनामाचे सुशीलकुमार अडागळे,ज्वेलर्स असोसिएशनचे शुभम आळंदीकर, महिला दक्षता समिती अध्यक्ष सुचिता साळवे, स्मिता भोसले, राणी होळकर, नुसरत इनामदार यांच्यासह परिसरातील पोलीस पाटील शरद खोमणे, विजयकुमार लिंबरकर,राजकुमार शिंदे, जयेंद्र सोनवणे, गणेश काकडे, भीमराव माघाडे आणि वैशाली मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांनी सायबर सुरक्षेबाबत घेतलेल्या या पुढाकाराचे परिसरातून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे