Breaking
ब्रेकिंग

जनसहभागातून सायकल स्पर्धेचे ‘ग्रँड’ नियोजन; वडगाव निंबाळकर पोलिसांच्या तत्परतेचे व ‘टीमवर्क’चे सर्वत्र कौतुक!

पुणे ग्रँड टूर चॅलेंज: २२ किमीच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त आणि उत्साही वातावरण

0 4 7 3 2 9

वडगाव निंबाळकर: नुकत्याच पार पडलेल्या ‘पुणे ग्रँड टूर चॅलेंज’ सायकल स्पर्धेचे नीरा-मोरगाव रस्त्यावर अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वितेमध्ये वडगाव निंबाळकर पोलिसांनी बजावलेली भूमिका आणि त्यांनी घडवून आणलेला अभूतपूर्व जनसहभाग सध्या चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरला आहे.

सुमारे २२ किलोमीटरच्या नीरा-मोरगाव टप्प्यात सायकलस्वार वेगाने जात असताना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी पोलिसांनी केलेले नियोजन वाखाणण्याजोगे होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस पथकाने केवळ स्वतःच्या बळावर अवलंबून न राहता, परिसरातील विविध संस्थांना सोबत घेऊन एक आदर्श ‘कम्युनिटी पोलिसिंग’चे उदाहरण समोर ठेवले.

या बंदोबस्तासाठी पोलिसांनी 

 * जुबिलंट इनग्रीव्हिया कंपनीचे ६० कामगार

 * पोलीस पाटील व आजी-माजी सैनिक संघटना

 * शरदचंद्र पवार कॉलेज व मु. सा. काकडे कॉलेजचे एनएसएस (NSS) विद्यार्थी

या घटकांचा प्रभावी वापर केला व यशस्वी नियोजन केले.

स्पर्धकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी प्रत्येक ५० ते १०० फुटांवर स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचारी तैनात केले होते. नीरा ते मोरगाव दरम्यानच्या कोळीवस्ती, गुळुंचे, ब्राह्मणदरा, चौधरवाडी, मोढवे या सर्व गावांमध्ये ग्रामस्थांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून, शिस्त पाळत स्पर्धकांचे स्वागत केले. चौधरवाडी येथील छोट्या घाटात आणि चौकात ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

“लोकांचा सहभाग आणि शाळा-महाविद्यालयांच्या उत्स्फूर्त मदतीमुळेच एवढी मोठी स्पर्धा आम्ही अत्यंत सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडू शकलो. नागरिकांनी केलेले सहकार्य कौतुकास्पद आहे.”

श्री.नागनाथ पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वडगाव निंबाळकर)

स्पर्धेत सहभागी झालेले सायकलस्वार अतिशय वेगाने पुढे जात होते, मात्र या वेळी कुठेही गोंधळ उडाला नाही. उलटपक्षी, पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात खेळाडूंचा उत्साह वाढवला. वडगाव निंबाळकर पोलिसांच्या या यशस्वी नियोजनामुळे भविष्यात अशा मोठ्या स्पर्धांच्या आयोजनासाठी हा परिसर सज्ज असल्याचे सिद्ध झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे