Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

आंतरराज्य सराईत घरफोड्या करणारा चोरटा गजाआड, १६ तोळे सोन्यासह २४ लाख ३० हजारांचा ऐवज जप्त शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई,

0 8 8 2 3 9

पुणे/शिक्रापूर : बंद घरांवर पाळत ठेवून घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल आंतरराज्य चोरट्याला शिक्रापूर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या चोरट्याला अमरावती येथून जेरबंद केले. त्याच्याकडून तब्बल १६ तोळे सोन्याचे दागिने आणि एक मोटारसायकल असा एकूण २४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे शिरूर आणि शिक्रापूर परिसरातील तीन घरफोड्यांचा उलगडा झाला आहे.

​दिपक भिमराव दांडगे (वय २५) असे या अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. तो मूळचा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी घरफोडीचे तब्बल १४ गुन्हे दाखल आहेत. शिक्रापूर आणि शिरूर परिसरात घरफोडीच्या घटना वाढल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी तपासाला गती देण्याचे व मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

​पोलिसांनी केवळ संशयितांची यादी न करता गुन्ह्यांची वेळ, पद्धत आणि सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास सुरू केला. या तांत्रिक विश्लेषणातून आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून, हा संशयित आरोपी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कविठा येथे आपल्या बहिणीकडे लपून बसल्याचे निष्पन्न झाले.

​या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने अमरावतीकडे धाव घेत कविठा येथे सापळा रचला आणि दिपक दांडगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने शिक्रापूर व शिरूर परिसरातील तीन घरफोड्यांची कबुली दिली. त्यानंतर त्याला रीतसर अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्याच्याकडून चोरीतील १६ तोळे सोन्याचे दागिने आणि एक मोटारसायकल असा लाखो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपीने मध्य प्रदेशातही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे.

​ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, तसेच पोलीस अंमलदार धनंजय थेऊरकर, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, रोहिदास पारखे, अमोल नलगे, मच्छिंद्र निश्चित, नारायण वाळके, राम जाधव, भारत भोसले, अस्मिता जोंधळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे संजय पड्याळ, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील व सागर धुमाळ यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे