Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

जीवे मारण्याचा प्रयत्न करून तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला मंचर येथून बेड्या; माळेगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

1 0 3 5 8 2

माळेगाव : जळगाव क.प. येथे जुन्या वादातून लोखंडी रॉड व इतर हत्यारांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात माळेगाव पोलिसांना मोठे यश आले आहे. अभय लक्ष्मण घोलप (रा. मेडद, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, सलग तीन महिने पाठपुरावा करून पोलिसांनी त्याला मंचर येथून शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मार्च २०२३ रोजी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे जळगाव क.प. येथे जुन्या वादाच्या कारणावरून फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांवर लोखंडी रॉड व इतर हत्यारांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पाच आरोपींना पोलिसांनी त्याचवेळी अटक करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, गुन्हा घडल्यापासून अभय घोलप हा फरार होता आणि वारंवार राहण्याचे ठिकाण बदलून पोलिसांना हुलकावणी देत होता.
फरार आरोपीच्या शोधासाठी माळेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने सलग तीन महिने अथक परिश्रम घेत गोपनीय माहिती संकलित केली. दरम्यान, आरोपी मंचर येथे वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार माळेगाव पोलिसांच्या पथकाने तात्काळ मंचर गाठले आणि मंचर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मदतीने २७ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून, माळेगाव पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस अंमलदार विष्णू गायकवाड, सागर पवार, धीरज कांबळे तसेच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे