Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई! काटेवाडीतील जुगार अड्डा उद्ध्वस्त,  ​’तेरा पानी रम्मी’वर पोलिसांची धाड; सात आरोपी गजाआड,तर  वाहनांसह ८ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त.

0 8 0 0 7 2

बारामती: काटेवाडी गावच्या हद्दीत सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर बारामती तालुका पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, वाहने आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ८ लाख ६ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै २०२६ रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास काटेवाडी हद्दीतील बारामती-इंदापूर रोडच्या कडेला असलेल्या प्रकाश टेंगले यांच्या पत्र्याच्या शेडच्या पाठीमागे एका झोपडीच्या आडोशाला काही लोक बेकायदेशीरपणे जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये बसून तेरा पानी रम्मी नावाचा जुगार खेळत आणि खेळवत असताना सात जण पोलिसांना आढळून आले. बाळू तुकाराम पोळ, मनेष मारुती शेंडगे, विनोद दिलीप लोंढे, सलीम अब्दुल बागवान, दगडू बाळू जाधव, महादेव सोमीनाथ माने आणि पंकज बापू भिसे अशी या कारवाईत पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

घटनास्थळावरून पोलिसांनी पत्यांचे कॅट, बॉक्स, रोख रक्कम आणि वाहने असा एकूण ८,०६,६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई जितेंद्र महादेव बिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अंमलदार पोलीस हवालदार खारतोडे असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बडे हे करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे