
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी : फॅक्टरी प्रसादनगर येथील ताहराबाद रोडलगत असलेल्या एका किराणा दुकानात शॉर्ट सर्कीट होवून लागलेल्या आगित अन्य दोन दुकाने जळून खाक झाली आहे.डोळ्या देखत दुकाने जळून खाक झाल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले. या आगित सुमारे सुमारे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

राहुरी फॅक्टरी येथे ताहराबाद रोडलगत प्रसादनगर भागात सकाहारी पुंड यांच्या मालकीचे तीन गाळे असून त्यातील सकाहारी पुंड यांच्या मालकीच्या श्री दत्त किराणा दुकानाला आज दुपारी दीड वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्कीट मुळे आग लागली.या आगीत किराणा दुकान पुर्णपणे जळून खाक झाले आहे.
किराणा दुकानातील आगीमुळे शेजारीच असलेल्या प्रीती निशिकांत साळवे यांच्या मालकीचे प्रीती ब्युटी पार्लर तर सारीका गणेश कांगळे यांच्या मालकीचे आरोही कलेक्शनला या दोन्ही दुकानाला आग लागल्याने.दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत.तीन दुकानाचे सुमारे १५ ते २० लाखांचे नुकसान झाले आहे.

किराणा दुकानासह अन्य दोन दुकाने आगीत जळत असताना बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली असताना आग विझविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.आग विझविण्यासाठी देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले होते.

यावेळी अग्निशमन विभाग प्रमुख गोपाल भोर, मंजाबापू बर्डे,चालक संतोष अवसरकर यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन विभागास नितीन पुंड,सचिन सरोदे, बंटी लोंढे,नवनाथ वाल्हेकर,जमीर पठाण,अमीन पठाण,सूरज विधाटे,आसिफ पठाण,गणेश कौसे,आदींनी सहकार्य केले.
दरम्यान घटनास्थळी महावितरणचे सहाय्यक अभियंता राहुल आहिरे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा