
बारामती : पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण पुणे यांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की, पुणे जिल्ह्यातील हद्दीमध्ये जुनी वाहने खरेदी विक्री करणारे व्यावसायीकांनी त्याचेकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनाबाबतची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात ७ दिवसांचे आत कळविणेबाबत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे आदेश निर्गमीत झाले होते. नमुद आदेशाची मुदत दि. १७,०५,२०२५ रोजी संपलेली आहे.

तरीही पुणे जिल्हयात जुनी वाहने खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. वाहन दुरुस्त करणारे करणारे किंवा दुकानातून खरेदी विक्री व्यवसाय करणाऱ्याची संख्याही जास्त आहे.
मागील एका घटनेत पुणे शहर हद्दीतील फरासखाना पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट मध्ये सातारा जिल्ह्यातील चोरीच्या मोटार सायकलीचा वापर करण्यात आलेला होता. तसेच अनेक दशहतवादी कारवायांमध्ये सुध्या चोरीच्या मोटारसायकलींचा सर्रास वापर होवून अनेक गंभीर गुन्हयांमध्ये गुन्हेगारांकडून चोरीच्या मोटार सायकली व इतर लहान मोठ्या वाहनांच्या मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे निर्देशनास आलेले आहे.

पुणे ग्रामीण जिल्हयात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झालेल्या असून जुन्या मोटारसायकली व वाहने यांची खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
परंतु या ठिकाणी खरेदी विक्रीचा योग्य तो तपशील ठेवला जात नसल्याने गुन्हेगारांकडून चोरीच्या वाहनांची खरेदी विक्री होण्याची दाट शक्यता असते किंबहुना आहे.

खरेदी विक्रीबाबत योग्य तपशील उपलब्ध होत नसल्याने त्याचा गुन्हे उघडकीस आणण्यासाठी परिणाम होतो. यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील हद्दीमध्ये जुनी वाहने खरेदी विक्रीबाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला असणे आवश्यक आहे.

तरी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जुनी वाहने खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांचेकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती जसे कि वाहन क्रमांक, इंजिन व चासी क्रमांक, मूळ मालकाचे नाव, मूळ गावचा व सध्या राहत असलेले ठिकाणाचा संपूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक, ओळखपत्र, वाहनांचे आर सी,टीसी बुक, खरेदी करणाऱ्याचे नाव, मूळ गावचा व सध्या राहत असलेल्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक व ओळखपत्र इ. दर ०७ दिवसांनी स्थानिक पोलीस स्टेशनला देणे आवश्यक असून याबाबत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ प्रमाणे आदेश निर्गमित करण्यास विनंती केलेली आहे.
त्याअर्थी
अप्पर जिल्हादंडाधिकारी पुणे, यांचेकडून प्रदान करण्यात आलेला प्रतिबंध आदेश…
पुणे ग्रामीण जिल्हयात जुनी वाहने खरेदी विक्री करणारे व्यावसायिकांनी त्यांचेकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणे आवश्यक असल्याबाबत माझी खात्री पटली आहे.
यास्तव खबरदारीचे उपाय म्हणून मी ज्योती कदम,अप्पर जिल्हादंडाधिकारी पुणे, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार खालीलप्रमाणे प्रतिबंध आदेश पारीत करीत आहे.
सदर आदेशाप्रमाणे पुणे ग्रामीण जिल्हयात जुनी वाहने खरेदी विक्री करणारे व्यावसायिकांनी त्यांचेकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न दिल्यास असे व्यावसायिक हे भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा